यदुनाथ दत्तात्रय थत्ते

मराठी लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

यदुनाथ दत्तात्रय थत्ते (जन्म : ५ आॅक्टोबर १९२२; - १० मे १९९८) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते.[]

जलद तथ्य यदुनाथ दत्तात्रय थत्ते, जन्म: ...
Remove ads

जीवन

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या थत्ते यांना १९४२ साली 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.

साहित्य

यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-

  • आटपाटनगर होते (बालकादंबरी)
  • आपला वारसा (चरित्रसंग्रह)
  • चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी (व्यक्तिचित्रण-बालसाहित्य)
  • पुढे व्हा (भाग १ ते ३, माहितीपर)
  • भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
  • यशाची वाटचाल (माहितीपर)
  • रेशमा (बालसाहित्य)
  • समर्थ व्हा,संपन्न व्हा (उपदेशपर)
  • साने गुरुजी (चरित्र)
  • साने गुरुजी : जीवन-परिचय (व्यक्तिचित्रण)
  • स्वातंत्र्यगीते (संपादित)
Remove ads

संदर्भ

जलद तथ्य

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads