यशवंत देव
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
यशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८) हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
बालपण
यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
कारकीर्द
आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.
Remove ads
कवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी
- अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात
- अशी धरा असे गगन कधी दिसेल का?
- अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा
- आयुष्यात खूप चौकटी पाहिल्या
- करिते जीवनाची भैरवी
- कामापुरता मामा
- कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
- कृष्णा उडवू नको रंग
- चंद्राविना ठरावी जशी
- जीवनात ही घडी अशीच राहू दे
- तुझी झाले रे
- तुझ्या एका हाकेसाठी
- तू नजरेने हो म्हणले पण वाचेने वदणार कधी
- तेच स्वप्न लोचनांत
- त्याची धून झंकारली
- दत्तगुरूंचे दर्शन घडले
- दिवाळी येणार अंगण सजणार
- नीज रे नीज रे बाळा
- प्रिया आज माझी नसे साथ द्याया
- प्रिया साहवेना आता
- प्रेमगीते आळविता
- भारतमाता परमवंद्य धरा
- मन हे खुळे कसे
- मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही
- माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे
- यश अंती लाभणार
- येतो तुझ्या आठवणींचा घेऊन सुगंध वारा
- रात्रिच्या धुंद समयाला
- लागेना रे थांग तुझ्या
- विश्वाचा खेळ मांडिला आम्ही
- शब्दमाळा पुरेशा न
- श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे
- स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी
|
पुरस्कार
पुस्तक
संदर्भबाह्य दुवे |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads