यशवंत पाठक
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्.ड़ी. मिळवली होती. त्यांचा हा प्रबंध 'नाचू कीर्तनाचे रंगी' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
यशवंत पाठक हे मनमाडच्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.
कवी किशोर पाठक हे यशवंतांचे कनिष्ठ बंधू.
Remove ads
डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके
- अंगणातले आभाळ (आत्मकथन) - ग्रंथाली प्रकाशन
- अंतरीचे धावे (धार्मिक) - ग्रंथाली प्रकाशन
- आनंदाचे आवार (लेखसंग्रह) - ग्रंथाली प्रकाशन
- कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध) - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर
- कैवल्याची यात्रा (धार्मिक - ज्ञानेश्वरांचा आणि विवेकानंदांचा ज्ञानयज्ञ, तुलना) - ग्रंथाली प्रकाशन
- Gandhi and the World (सहलेखक - देवीदत्त अरविंद महापात्रा)
- चंदनाची पाखर (कथासंग्रह) - ग्रंथाली प्रकाशन
- चंद्राचा एकांत (ललित लेख) - ग्रंथाली प्रकाशन
- नाचू कीर्तनाचे रंगी (मराठी किर्तनावरील प्रबंध) - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
- निरंजनाचे माहेर (धार्मिक) मुक्ताई, जनाई, वेणाई काव्य समीक्षा - त्रिदल प्रकाशन
- पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने) - ग्रंथाली प्रकाशन
- ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी) मौज प्रकाशन गृह
- Meanings of Old Age and Aging in the Tradition of India (सहलेखक - डाॅ. श्रीनिवास टिळक)
- मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह) -मॅजेस्टिक प्रकाशन
- येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ (सोनोपंत दांडेकरांचे चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान)
- संचिताची कोजागिरी (कादंबरी) - ग्रंथाली प्रकाशन
- आभाळाचं अनुष्ठान - कथासंग्रह - ग्रंथाली प्रकाशन
- मनाच्या श्लोकांचे मर्म - मनाच्या श्लोकांचा अर्थ - राजहंस प्रकाशन
Remove ads
प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- चतुरंग पुरस्कार
- डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार (अंगणातले आभाळ (आत्मकथन),नाचू कीर्तनाचे रंगी, निरंजनाचे माहेर आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या पुस्तकांना)
- संत विष्णूदास कवी पुरस्कार
- जळगाव येथे १७ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या १०व्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- यशवंत पाठक हे विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेल्या नामांकित अश्या बाबुजी देशमुख व्याख्यानमालेचे एक व्याख्याते होते.
- डाॅ.यशवंत पाठक हे कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य होते.
- संत ज्ञानदेव पुरस्कार
- नाशिक येथे १५ ते १७ मार्च २०१३ या काळात भरलेल्या २५व्या रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
प्रा. यशवंत पाठक यांचे व्याख्यान प्रा. यशवंत पाठक व्याख्यानमाला
प्रा. यशवंत पाठक यांचे व्याख्यान ऐकण्याकरता त्यांच्या Yashwant Speech या Youtube Channelला नक्की भेट द्या. याची लिंंक पुढे देत आहे. https://www.youtube.com/channel/UC1i1GSFcshdebf2Jo0L49yA/featured
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads