देवगिरीचे यादव

From Wikipedia, the free encyclopedia

देवगिरीचे यादव
Remove ads

देवगिरीचे यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७), यांना सेवुण/सेऊण राजवंश असेही म्हणले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते. ते स्वतःला सोमवंशी म्हणवत.

जलद तथ्य

साचा:संदर्भ- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील ओवी

यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळहाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लमदेव यादव याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे नाव होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले. [][] []

  • राजा सिंघण (दुसरा) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली.
  • सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते.
  • सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती.
  • पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले.
  • यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय, यांच्या वडिलांच्या रामचंद्राच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला.

यांच्या कारकिर्दीतच अल्लाउद्दिन खिलजी ने त्यांना फितूरीने पराभूत केले.

  • रामदेवरायांचे जावई व सेनापती हरपालदेव यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई हरपालदेवांच्याच कुळातील आहेत.
    • त्यांचे माहेरचे कूळ जाधवराव हे यादवांचे थेट कुळी.

महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे, बारव स्थापत्यादी अनेक वास्तू ह्या देवगिरीच्या यादवसम्राटांशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आजही अनेक ठिकाणी त्याचे अवशेष पहावयास मिळतात.[]

Remove ads

पुस्तक

  • देवगिरीचे यादव: इतिहास संशोधक महामहोपाध्याय डॉ.ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादव राजवंशावर लिहिलेला हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणाऱ्या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम(पाचवा), जैतुगी(द्वितीय), सिंघणदेव(द्वितीय), कृष्णदेव,रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे.
Remove ads

पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads