रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा इ.स. २०१० मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला मराठी चित्रपट आहे.[][] रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री निशा परुलेकर यांनी साकारली आहे.

जलद तथ्य रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई), दिग्दर्शन ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून बॉलीवुडचे प्रख्यात संकलक प्रकाश जाधव यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.

Remove ads

कलाकार

अनिल सूतार, अनूया बाम, अमेय पोतदार, आर.जी.पवार, कोमल आपके, खूशी रावराणे, गजानन रानडे, गणेश जेठे, जयंत यादव, दत्ता बोरकर, दत्ता रेडकर, दशरथ रागणकर, दशरथ हृतिसकर, दिपज्योती, नंदकूमार नेवालकर, निमेश चौधरी, निशा परूळेकर, नेत्रा पराडकर, परांजपे, पुजा जोशी, प्रथमेश प्रदीप, प्रदिप भरणकर, प्रभाकर मोरे, फडके गूरूजी, बालकलाकार: क्रिती शेरेगार, मनाली चक्रंदेव, मनोज टाकणे, महेश चव्हाण, महेश ठाकूर, मिलींद चक्रदेव, राधेया पंडीत, रोहित रोडे, विक्रांत उकार्डे, विमल घाटकर, विलास जाधव, शंकर मळेकर, शरयू, शैलेंद्र चव्हाण, संकेत पवार, सतिश मूळे, सदाशिव चव्हाण, संदेश उतेकर, सायली विलनकर, साहील कांबळे, सोनाली मूळे, स्नेहल विलनकर

Remove ads

गीते

चित्रपटातील गीते खालिलप्रमाणे आहेत:-

  1. ) तुझ्या तू माझी माय माऊली,
  2. ) पडती अक्षता डोईवरती,
  3. ) हात कटेवर उभा विटेवर,
  4. ) घालूनी पाणी तुळशीला रांगोळी काढते,
  5. ) दारिद्रयाची झळ सोसते आज रमाऽ,
  6. ) बॅरिस्टर बनूनी साहेब जेव्हा आले बंदरावरती
  7. ) तुझ्या संग संसार थाटीला

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads