राहाता तालुका

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia

राहाता तालुका
Remove ads

राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हा लेख राहाता तालुका विषयी आहे. राहाता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जलद तथ्य राहाता तालुकाराहाता तालुका, राज्य ...

राहाता पूर्वी कोपरगाव तालुक्यात होता. अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी कोपरगाव जिल्हा कृती समिती स्थापन केली आहे.

राहाता गावाचे आराध्य दैवत म्हणजे वीरभद्र महाराज आणि नवनाथ महाराज आहे. या देवांची जत्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या सुमारास भरत असते. आदल्या दिवशी नवनाथ महाराजांची जत्रा भरते, व दुसऱ्या दिवशी वीरभद्र महाराजांची जत्रा भरते. या दोन्ही दिवशींच्या जत्रेचे प्रतीक म्हणजे वाजत गाजत निघणारी गळवंती. पहिल्या दिवशी गळवंती वीरभद्र मंदिराकडून नवनाथ मंदिराकडे नेतात व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिराकडून वीरभद्र मंदिराकडे नेतात. त्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोर डफाचा खेळ असतो, व त्याच बरोबर गळवंतीचा कार्यक्रमही चालत असतात.

राहाता शहर अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गावर मधोमध व शिर्डीपासून ४ कि.मी. अंतरावर आहे़.

Remove ads

बाह्य दुवे

  • "राहता तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads