रामचंद्र चिंतामण ढेरे
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[१], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.
रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या
Remove ads
कार्य
प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.
Remove ads
लहानपण
ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[२]
Remove ads
संग्रह
रा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.
प्रकाशित साहित्य
Remove ads
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार १९८७ - 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय'
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं.ना. जोगळेकर पुरस्कार (२०१३)
- त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०)
- पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार (२०१३)
- अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२९-३-२०१५)
- चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना 'साहित्य सेवा सन्मान' त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. (२६-२-२०१६)
Remove ads
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads