होन

होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे. From Wikipedia, the free encyclopedia

होन
Remove ads

होन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकालीन अर्थव्यवस्थेत वापरले जाणारे एक प्रमुख चलन होते. "होन" हा शब्द प्राकृतमधील "सुवर्ण" (सोने) या शब्दापासून आला असून, याचा अर्थ सोन्याचे नाणे असा आहे. शिवकालीन अर्थव्यवस्थेत होन आणि शिवराई ही नाणी व्यापार, कर संकलन आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरली जात होती.

Thumb
शिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.

इतिहास आणि उत्पत्ती

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी स्वतःची नाणी पाडली. होन हे सोन्यापासून बनवलेले नाणे होते, तर शिवराई हे तांब्याचे किंवा चांदीचे नाणे होते. होनचा वापर प्रामुख्याने मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी होत असे. या नाण्यांवर शिवाजी महाराजांचे नाव किंवा प्रतीके असत, ज्यामुळे स्वराज्याची स्वायत्तता दिसून येत असे.




Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads