रोहे

रायगड जिल्ह्यामधील एक शहर From Wikipedia, the free encyclopedia

रोहे
Remove ads

रोहा (मराठी लेखनभेद: रोहा ;) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. रोहा कोकण प्रदेशामध्ये कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोह्याची लोकसंख्या सुमारे २७ हजार (इ.स. २०११) आहे. अनेक रासायनिक उद्योगांनी रोह्याजवळ धाटाव येथे कारखाने उभारले आहेत. रोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे

जलद तथ्य

रोहा मुंबई पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे , तर पुण्यापासून १२८ किलोमीटर दूर आहे तसेच अलिबाग पासून ४७ किलोमीटर दूर आहे. कोकण रेल्वेमार्गाची सुरुवात रोहे रेल्वे स्थानकापासून होते. राष्ट्रीय महामार्ग 66 शहरातून जात नाही मात्र कोलाड व नागोठणे इथे जोडलेला आहे .येथे नदी संवर्धन प्रकल्प देखील आहे जे कुंडलिका नदीच्या तीरावर आहे हनुमान टेकडी देखील प्रसिद्ध आहे . धाविर महाराज देवस्थान हे रोहा शहराचे ग्रामदैवत आहे नयनरम्य मंदिर आहे . येथे मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते

रोहा येथुन मुंबईला जाण्यासाठी रोहा दिवा पॅसेंजर उपलब्ध आहे. दादर रत्‍नागिरी , दिवा - सावंवाडी पॅसेंजर, नेत्रावती एक्स्प्रेस , तुतारी(राज्य राणी) एक्स्प्रेस , व काही साप्ताहिक , आणि फेस्टिवल स्पेशल रेल्वे रेल्वे गाड्या थांबतात .

रोहा बस स्थानकावरून कोल्हापूर, पुणे, मुंबई, बोरिवली, अलिबाग, सिल्लोड, नाशिक, शिर्डी , तुळजापूर, सातारा, ई. ठिकाणी बस सुटतात.

रोहा कोलाड व्हाईट रिव्हर राफ्टिंग , बंजी जम्पिंग येथुन ७-८ किमी वर आहे रोहा - कोलाड - भिरा रस्त्यालगत आहे.



Remove ads

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.




जवळपासची गावे

धाटाव, किल्ला, आंबेवाडी, कोलाड, वरसगाव, सुतारवाडी, चणेरा, खारगाव, घोसाळे, नागोठणे, वाकण, सुकेळी, भातसई, मेढा, आमडोशी, खांब, देवकान्हे.


संदर्भ

  1. .https://villageinfo.in/
  2. .https://www.census2011.co.in/
  3. .http://tourism.gov.in/
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. .https://www.mapsofindia.com/

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads