वसंत गोवारीकर
माहिती वसंत गोवारीकर . From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
वसंत रणछोड गोवारीकर (जन्म : पुणे, २५ मार्च १९३३; मृत्यू :३ जानेवारी २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.
Remove ads
जन्म आणि बालपण
वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म पुणे येथे झाला.[१] त्यांचे वडील इंजिनिअर होते.
गोवारीकरांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी.आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम्.एस्सी. पूर्ण केले [२].
त्यानंतर रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट या पदव्या प्राप्त केल्या.[३]
Remove ads
जीवन
त्यानंतर प्रथम त्यांनी हार्व्हेल येथील अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशनच्या समरफील्ड रिसर्च स्टेशन येथे, संशोधन केले. त्याच दरम्यान डॉ. गोवारीकर यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.
संदर्भ व नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads