विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.[१][२] अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.[३][४]

Remove ads
इतिहास
७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाच्या परवानगीने दलित फाऊंडेशनने २००७ मध्ये सर्व पानांचे लॅमिनेशन करून जतन केला असून तो शाळेच्या मुख्य कार्यालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात आला आहे. दलित फाउंडेशन ही अस्पृश्यता प्रथा निर्मूलनासाठी दलित युवा नेतृत्वाला बळकट करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. इ.स. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती. शेवटी इ.स. २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.[५]
Remove ads
उद्देश
साताराच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी ७ नोव्हेंबरला राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राच्या सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा मधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबरला “विद्यार्थी दिवस” म्हणजे साजरा करण्याचा निर्णय घेतला. इ.स. २०१७ मध्ये बाबासाहेबांचा शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.[६][७][८]
Remove ads
हे सुद्धा पहा
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads