सत्यजित खारकर
लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
सत्यजित खारकर हे लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत.
चित्रपट
कॉईन टॉस
सत्यजित खारकर यांनी दिग्दर्शित केलेला इंग्रजी चित्रपट कॉईन टॉस हॉलीवूडमध्ये तयार झाला. [१][२][३]
कथानक
एका आजारी आईने आपल्या मुलाला मृत्युपूर्वी दिलेले एक ‘लकी नाणे’ त्याच्या आयुष्यात कशी धमाल घडवते, अशी या सिनेमाची कथा सत्यजित खारकर व मेरी ट्रिमबल यांनी मिळून लिहिली आहे. सिनेमात भारतीय आणि अमेरिकन कलाकार आहेत. [४]
पुरस्कार
२०१२ साली अमेरिकेतील ‘इलिनोइस’ राज्याची राजधानी असलेल्या ‘स्प्रिंगफील्ड’ शहरात अकराव्या "राऊट 66" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. जगभरातील अनेक सिनेमांमधून निवडक सिनेमे या महोत्सवामध्ये दाखविण्यात आले. ‘ऑडियन्स फेव्हरिट डेब्यू फिल्म’ हा पुरस्कार या सिनेमाने पटकाविला.[५][६]
Remove ads
लघुपट
माय डॅड माय हिरो
२०११ साली सत्यजित खारकर यांच्या "माय डॅड माय हिरो" या लघुपटास लॉस एंजेलस येथील लाईफ फिल्म फेस्टिव्हल मध्ये ऑडियन्स फेव्हरेट आणि सर्वोत्कृष्ट लघुपट असे दोन पुरस्कार मिळाले. [७]
आणि जगण्याचा अर्थ गवसला
सत्यजित खारकर यांनी ओंकार वैद्य या बालश्री पुरस्कार विजेत्या दिव्यांग तरुणावर त्याची जिद्द बघून "आणि जगण्याचा अर्थ गवसला" हा स्फूर्तिदायक माहितीपट बनवला. [८]
पायथागोरसचे अदभुत प्रकरण
२०१७ साली औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानाट्य शास्त्र विभागाने त्यांना अतिथी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आमंत्रित केले. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यां सोबत त्यांनी "पायथागोरसचे अदभुत प्रकरण" हा विनोदी लघुपट बनविला.
दिशा
२०१८ साली सत्यजित खारकर यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर थेट भाष्य करणारा व या समस्येवर सनदशीर पर्याय सांगणारा दिशा हा लघुपटही दिग्दर्शित केला. या चित्रपटामध्ये भारत गणेशपुरे याची मध्यवर्ती भूमिका आहे. [९]
Remove ads
लेखन
कथासंग्रह
करू का गुदगुल्या
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे ( २०१८) तर्फे प्रकाशित "करू का गुदगुल्या" या विनोदी पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ अभिनेते लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांची आहे. आपल्या प्रस्तावनेत श्री दिलीप प्रभावळकर म्हणतात की "सत्यजितने निर्माण केलेले हे वेगळेच जग आहे. स्लॅपस्टिक कॉमेडी प्रकारात मोडणारी रॉकेट ही कथा वाचताना तर मला लॉरेल हार्डी किंवा मार्क्स ब्रदर्सचा सिनेमा पाहतोय असे वाटले " [१०] [११]
सत्यजित खारकर यांच्या "करू का गुदगुल्या" या मराठी विनोदी कथासंग्रहाला २०१८चा कै. सावित्रीबाई जोशी स्मृती प्रतिष्टान पुरस्कार मिळाला आहे. [१२] [१३] [१४]
नाटक
येस, आय एम गिल्टी
अत्यंत आगळ्या विषयाचे मेडिको-लीगल नाटक. कार अपघातामुळे कोमा मध्ये असलेल्या पतीचे स्पर्म्स आय व्ही एफ साठी देण्यात यावेत अशी कोर्टात लढाई लढणाऱ्या एका आधुनिक स्त्रीची कहाणी खारकर यांनी या नाटकात सांगितली आहे.[१५][१६][१७]
पुरस्कार
लेखन पुरस्कार
कै. सावित्रीबाई जोशी स्मृती प्रतिष्टान पुरस्कार
सत्यजित खारकर यांच्या "करू का गुदगुल्या" या मराठी विनोदी कथासंग्रहाला २०१८चा कै. सावित्रीबाई जोशी स्मृती प्रतिष्टान पुरस्कार मिळाला आहे. [१२] [१३] [१४]
चित्रपट पुरस्कार
झी टॉकीज कथायण चषक 2021
येस,आय एम गिल्टी या पटकथेस झी टॉकीज कथायण चषक 2021चा पुरस्कार मिळाला. [१८][१६][१७][१९]
राऊट 66 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
२०१२ साली अमेरिकेतील ‘इलिनोइस’ राज्याची राजधानी असलेल्या ‘स्प्रिंगफील्ड’ शहरात अकराव्या "राऊट 66" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. जगभरातील अनेक सिनेमांमधून निवडक सिनेमे या महोत्सवामध्ये दाखविण्यात आले. ‘ऑडियन्स फेव्हरिट डेब्यू फिल्म’ हा पुरस्कार या सिनेमाने पटकाविला.[५][६]
लाईफ फिल्म फेस्टिव्हल
२०११ साली सत्यजित खारकर यांच्या "माय डॅड माय हिरो" या लघुपटास लॉस एंजेलस येथील लाईफ फिल्म फेस्टिव्हल मध्ये ऑडियन्स फेव्हरेट आणि सर्वोत्कृष्ट लघुपट असे दोन पुरस्कार मिळाले. [७]
Remove ads
इतर
- सत्यजित खारकर यांनी २०११मध्ये ‘बीएमएम’च्या अधिवेशनासाठी शिकागो येथील अबालवृद्धांना घेऊन ‘वेलकम टू शिकागो’ हा लघुपटही तयार केला होता.[४]
- सप्टेंबर २०१४ साली शिकागो येथे झालेल्या दक्षिण आशियायी लेखक व कलावंतांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या कृती फेस्टिव्हलमध्ये सत्यजित खारकर यांची पॅनेल सदस्य म्हणून निवड झाली होती. [२०]
- भारतातील रोड अपघातांच्या भीषण समस्येविषयी सत्यजित खारकर यांनी दिव्य मराठी वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सिनेमागृहात अपघाताचे धडकी भरवणारे सीसी टीव्ही फुटेज दाखवावे असा उपाय सुचवला [२१]
- भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनने प्रेरित होऊन औरंगाबादच्या तरुणांना घेऊन त्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारा "स्वच्छ भाई" नावाचा लघुपट बनविला. ५० वर्षांचा एक डॉन प्रेमासाठी भाईगिरी सोडून स्वच्छतेकडे कसा वळतो अशी या सिनेमाची कथा आहे . ज्येष्ठ पत्रकार व अमेरिकेत स्थायिक झालेले मयांक छाया यांनी सिनेमाचे लेखन केले.[२२]
Remove ads
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads