सुहासिनी इर्लेकर
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डॉ. सुहासिनी इर्लेकर (जन्म : सोलापूर-महाराष्ट्र, इ.स. १९३२; - -बीड-महाराष्ट्र, २८ ऑगस्ट २०१०) या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या.
डॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागप्रमुख होत्या. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित केले होते. इर्लेकरांचे १०हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
Remove ads
प्रकाशित साहित्य
- अभंगसागरातील दीपस्तंभ (संतसाहित्याचा तौलनिक अभ्यास)
- अक्षर (कवितासंग्रह)
- आई! ती माझी आई (कथासंग्रह)
- आकाशाच्या अभिप्रायार्थ (साहित्य आणि समीक्षा)
- आजी आणि शेनवॉर्न (बालसाहित्य)
- आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव
- आल्या जुळून तारा (साहित्य आणि समीक्षा)
- गाणारे देवघर
- गाथा (कवितासंग्रह)
- गुरुशिष्यसंवाद आणि समाधिसंकल्पना (माहितीपर)
- चित्रांगण (कथा, लेख, भाषणे)
- छांदस (कवितासंग्रह)
- संत जनाबाई (पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)
- जनाबाईचे निवडक अभंग (संतसाहित्यपर)
- नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य (रसग्रहण)
- नाथांचे रुक्मिणी-स्वयंवर
- नाना फडणविसांचे आत्मचरित्र (ग्रंथपरिचय)
- नामदेवकृत ज्ञानेश्वरचरित्र (ग्रंथपरिचय)
- बुद्ध चरित गाऊ या (कवितासंग्रह)
- भगवान गौतमबुद्ध (मार्गदर्शपर)
- महानंदेचे धवले (कादंबरी)
- मी भारतीय आहे
- मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण)
- यादवकालीन मराठी काव्यसमीक्षा (वैचारिक)
- संत कवि आणि कवयित्री : एक अनुबंध (साहित्य आणि समीक्षा)
- संत साहित्य - एक रूपवेध
- समर्थ रामदासांची करुणाष्टके (ग्रंथपरिचय आणि रसग्रहण)
- साहित्यसंवाद (साहित्य, साहित्य आणि समीक्षा)
- स्फुट आणि अस्फुट
- ह्या मौन जांभळ्या क्षणी (कवितासंग्रह)
- ज्ञानियांचा राजा (संत साहित्याचे सखोल विवेचन)
- ज्ञानेश्वरीचे अंतरंग (ग्रंथपरिचय)
Remove ads
पुरस्कार/सन्मान
- बीड नाट्यपरिषदेतर्फे दिला जाणारा (कै.) डॉ. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. (२०१३).
- बीड शहरात २०१३सालच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात डॉ.सुहासिनी इर्लेकर यांच्या कवितांवर ‘आकाशाच्या अभिप्रायार्थ’ हा वाचन, नृत्य, गायन असा काव्य संग्रहणाचा खास कार्यक्रम झाला. तो साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांनी दिग्दर्शित केला होता. संमेलनस्थळाला सुहासिनी इर्लेकरांचे नाव देण्यात आले होते.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ’सुहासिनी इर्लेकर पुरस्कार’ दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार ..., ..., पृथ्वीराज तौर (२०१४) यांना मिळाला आहे.
- सुहासिनी इर्लेकर यांना वारकरी साहित्य परिषदेतर्फे मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला (६-१०-२०१३)
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads