सेल्सियस
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
सेल्सियस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तापमान या दोन मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.
सेल्सियस तापमान मापनप्रणालीनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) सेल्सियस तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची वाफ ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे. हे अतिलंबित (extrapolate) करता, - २७३.१५° सेल्सियस हे निरपेक्ष (absolute) शून्य तपमान आहे.
या तापमानाचे एकक अँडर्स सेल्सियस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
सेल्सियसला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads