स्तनाचा कर्करोग

From Wikipedia, the free encyclopedia

स्तनाचा कर्करोग
Remove ads

स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता आढळते.

Thumb
स्तनाचा कर्करोगातील प्रारंभिक लक्षणे .स्तनात गाठ तयार होणे, .स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे, .स्तनाच्या त्वचेवर रंग व पोतात बदल, .बोंडशीत बदल, .बोंडशीतून रक्त अथवा रंगहीन स्राव येणे.
Remove ads

प्राथमिक लक्षणे

स्तनाचा कर्करोगातील प्रारंभिक लक्षणे

  • स्तनात गाठ तयार होणे,
  • स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे,
  • स्तनाच्या त्वचेवर रंग व पोतात बदल,
  • बोंडशीत बदल,
  • बोंडशीतून रक्त अथवा रंगहीन स्राव येणे.

स्तनांच्या कर्करोगांची कारणे

इतर कर्करोगाप्रमाणे स्तनांच्या कर्करोगांची सुरुवात ही बाहेरील वातावरण आणि आपली आनुवंशिकता याच्याशी निगडीत आहे.

आपल्या शरीरातील पेशींची जेंव्हा अनिर्बंध वाढ होऊ लागते तेंव्हा कर्करोगाची लागण होते. त्याच प्रमाणे जेंव्हा स्तनातील पेशींची अनिर्बंध वाढ होते तेंव्हा स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. स्तनाच्या पेशीत होणाऱ्या बदलाचा संबध स्त्री संप्रेरक एस्त्रोगेन ह्याच्याशी निगडीत असल्याचे वैज्ञानिक रित्या सिद्ध झाले आहे.

Remove ads

लक्षणे व तपासणी

स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात या कर्करोगाचा इतिहास आहे अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो.ज्या स्त्रियामध्ये मासिक पाळी लवकर सुरू झाली आहे, ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असू शकते.जर मुले वयाच्या तिशीनंतर झाली असतील तर अशा स्त्रियांना धोका असू शकतो.

लक्षणे

  • स्तनामध्ये गाठ येणे
  • स्तनामध्ये दुखणे
  • स्तनाच्या टोकाला खाज सुटणे
  • स्तनामधून स्त्राव येणे ( दुधाशिवाय)
  • स्तनाच्या टोकावर भेगा पडणे व वेदना होणे
  • स्तनाची बोंडे आतमध्ये जाणे.

रोग निदान

स्त्रिया स्तनाची तपासणी करून,गाठ असेल तर कुठे व कशी आहे? गाठ वाढते आहे का?हे पाहू शकतात. जर गाठ जाणवली तर डॉक्टरांकडून मॅमोग्राफी करून खात्री करता येईल .तसेच स्कॅन्निंग करूनही खात्री करता येते.त्याचप्रमाणे रक्ताच्या काही तपासण्या (तुमोर मार्कर) करून याबद्दल खात्री करून घेत येते. तसेच सोनोग्राफी करूनही खात्री करता येते.स्तनाच्या कर्करोगाची शंका आल्यास डॉक्टर शेवटी पूर्ण खात्री करण्यासाठी बायोप्सी करायचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे स्तनाच्या गाठीचा तुकडा काढून कर्करोगाची खात्री पटल्यास संपूर्ण गाठ काढून टाकली जाते.

वर्गीकरण

स्तनाच्या कर्करोगाचे वर्गीकरण

  • स्तर ०- कर्करोगपूर्व स्थिती, मार्कर तपासण्या होकारात्मक, दुग्धवाहिन्यांमध्ये किंवा इतरत्र गाठ.
  • स्तर १ ते ३- कर्करोगाची गाठ स्तनात किंवा लसिकांमध्ये.
  • स्तर ४- कर्करोग इतरत्र पसरलेला.

उपचार

स्तनाच्या कर्करोगाचा उपचारामध्ये रोगाचा स्तर व प्रसार यावर अवलंबून रहाते. यामध्ये शस्त्रक्रिया, रसायनोपचार व किरणोत्सर्गाच्या सहाय्याने उपचार केले जातात.

  • स्तर ० व १- कर्करोग पूर्व स्थिती गाठ काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते व औषधांच्या सहाय्याने अटकावाचा प्रयत्न केला जातो.
  • स्तर २ ते ३- कर्करोगाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते व रसायनोपचाराच्या औषधांच्या सहाय्याने प्रयत्न केला जातो. यामध्ये रोग पुनरउदभावाची शक्यता असते.
  • स्तर ४- कर्करोग इतरत्र पसरलेला असल्याने भविष्यद्वाणी खराब असते. शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गाचा वापर व रसायनोपचार यांच्या एकत्रितपणे वापर करून प्रयत्न केला जातो.

स्तनाच्या कर्करोगासाठी ऑपरेशन केल्यानंतर प्रकृती पुन्हा पहिल्यासारखी होण्यासठी लागणारा वेळ प्रत्येक स्त्री साठी वेगळा असू शकतो.

ऑपरेशन नंतर होणारे शारीरिक आणि भावनिक बदल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढील काही लक्षणे ऑपरेशन नंतर स्त्रियांमध्ये दिसू शकतात.

१) चिंता २) भय ३) नैराश्य ४) स्वतःबद्दल कमीपणा ५) लैंगिक संबंधाबद्दल अनिच्छा

ऑपरेशन नंतर आपली मनस्थिती भयमुक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकरिता आपले डॉक्टर, जवळचे नातलग, मित्रपरिवार यांच्याकडून मदत मिळवावी.

तसेच ऑपरेशन नंतर दरवर्षी नियमित चाचण्या करून घेणे ही महत्त्वाचे आहे.

Remove ads

कर्करोगाशी लढण्याची क्षमता

छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. []

Remove ads

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads