स्वप्नील जोशी

अभिनेते From Wikipedia, the free encyclopedia

स्वप्नील जोशी
Remove ads

स्वप्नील जोशी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदीमराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.

जलद तथ्य स्वप्नील जोशी, जन्म ...
Remove ads

वैयक्तिक जीवन

स्वप्नील जोशी याचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपले शिक्षण बैरामजी जीजीभाॅय या मुंबई-गिरगावातील शाळेतून व नंतरचे शिक्षण सिडनहॅम काॅमर्स काॅलेजातून केले.[] स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी औरंगाबादमधल्या ताज हॉटेलमधील लीना आराध्येशी दुसरे लग्न केले. तीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे. स्वप्निल जोशी हा महागुरू श्री सचिन पिळगावकरजी ह्यांना आपले आदर्श आणि पितृतुल्य मानतो.[] सचिनचा वर्तमानकाळ हा स्वप्निलचा भविष्यकाळ असणार आहे.सचिनचा भूतकाळ हा स्वप्निलचा वर्तमानकाळ आहे.

Remove ads

कारकीर्द

वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी याने रामानंद सागर यांच्या 'उत्तर रामायण' या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्याच 'श्रीकृष्ण' या हिंदी मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका पण निभावली.[] सिटी ऑफ ड्रीम्स ह्या वेबसीरिजचा पुढील भाग येणार आहे त्यामध्ये गृहमंत्री ह्या भूमिकेसाठी स्वप्निल जोशी ह्यांना घेण्यासाठी महागुरू सचिन पिळगावकर स्वतः आग्रही आहेत.

Remove ads

मराठी चित्रपट

  • भिकारी
  • तू ही रे
  • गेट वेल सून (नाटक)
  • गुलदस्ता
  • चेकमेट
  • टार्गेट
  • तुकाराम
  • दुनियादारी
  • पक पक पकाक
  • पोश्टर गर्ल
  • प्रेमासाठी कमिंग सून
  • बघतोस काय मुजरा कर
  • बाजी
  • मुंबई-पुणे-मुंबई (१,२,३)
  • मेंटर
  • मोगरा फुलला
  • व्हेंटिलेटर
  • शाळा
  • सुंबरान

दूरचित्रवाणी मालिका

बाह्य दुवे

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads