१९५० फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझिल देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८ च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ही स्पर्धा भरवली गेली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १५ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
उरुग्वेने अंतिम साखळी गटात यजमान ब्राझिलला २–१ असे पराभूत करून दुसरे अजिंक्यपद मिळवले. विजेतेपदासाठी अंतिम फेरीचा सामना न खेळवला गेलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.
Remove ads
पात्र संघ
दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनी व जपानला ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते. तसेच पूर्व युरोपातील सर्व देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. आशिया गटामधून बर्मा, फिलिपाईन्स व इंडोनेशियाने असमर्थता दाखल्यामुळे भारत देशाला विश्वचषकात खेळण्याची प्रथमच पात्रता मिळाली.
बोलिव्हिया
ब्राझील (यजमान)
चिली
इंग्लंड
इटली (गतविजेते)
मेक्सिको
पेराग्वे
स्पेन
स्कॉटलंड
स्वीडन
स्वित्झर्लंड
अमेरिका
उरुग्वे
फ्रान्स (स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार)
भारत (स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार)
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताने प्रवासखर्च, संघाला सरावाचा अभाव व संघनिवडीच्या समस्या इत्यादी कारणांस्तव ह्या स्पर्धेमधून अंग काढून घेतले. फ्रान्सने देखील प्रवासखर्चाचे कारण दाखवत ह्या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. ह्यामुळे केवळ १३ देशांचे संघ ह्या स्पर्धेत खेळले.
Remove ads
यजमान शहरे
ब्राझिलमधील सहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
Remove ads
स्पर्धेचे स्वरूप
ह्या स्पर्धेमध्ये १५ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. बाद फेरीऐवजी सर्वोत्तम चार संघांमध्ये पुन्हा एकदा साखळी फेरी खेळवली गेली. ह्या अंतिम साखळीमधील सर्वोत्तम संघाला विजेतेपद देण्यात आले.
अंतिम साखळी फेरी निकाल
Remove ads
बाह्य दुवे
- फिफाच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2016-03-07 at the Wayback Machine.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads