आषाढी वारी (पंढरपूर)
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी वारकरी पदयात्रा / From Wikipedia, the free encyclopedia
आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.[1] 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.[2] वारी हा एक आनंद सोहळा असतो.[3][4]
हा लेख वारकरी (निःसंदिग्धीकरण) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वारकरी (निःसंदिग्धीकरण) (निःसंदिग्धीकरण).