![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/42/IndraNooyiDavos2010ver2.jpg/640px-IndraNooyiDavos2010ver2.jpg&w=640&q=50)
इंद्रा नूयी
From Wikipedia, the free encyclopedia
इंद्रा राजकिशन नूयी (तमिळ: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (जन्म : २८ ऑक्टोबर, १९५५:चेन्नई, तमिळनाडू, भारत) ह्या पेप्सिको' कंपनीच्या २ मे २००६पासून चेरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या अमेरिकन नागरिक असून जन्माने भारतीय आहेत. ६ ऑगस्ट २०१८ रोजी त्या पेप्सिकोच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्या.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/42/IndraNooyiDavos2010ver2.jpg/640px-IndraNooyiDavos2010ver2.jpg)
फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत इंदिरा नूयी यांना २००८ साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. फाॅॅर्चुन मॅॅगझिनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक जाहीर केले.[1]