कझाक भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
कझाक ही मध्य आशियामधील कझाकस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच ही भाषा थ्यॅन षान पर्वतरांगेपासून ते कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या भूभागामध्ये वापरली जाते. चीनच्या शिंच्यांग प्रदेशात तसेच रशिया, मंगोलिया व उझबेकिस्तान येथे कझाक भाषिक वसले आहेत.