कुचिपुडी ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे. हिला 'अट्ट भागवतम' असेही म्हणले जाते.[1]

आंध्र प्रदेशातील या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. १५१० ते १५३० या काळात झाला. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापूर्वी या कलेचा उगम झाला असून आंध्र प्रदेशातील भागवतार ब्राह्मणांकडून हे नृत्य सांभाळले गेले.[2][3] वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. सहाव्या शतकातील भक्तिसंप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या कलाप्रकाराचे विशेष योगदान आहे.[4] कुचिपुडी या गावात रामायणातील कथा या गीत,नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत. त्यांना 'कुशीलव' असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरूष पात्रांचा सहभाग असतो. भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीचा समन्वयही या नृत्यप्रकारात साधला गेलेला दिसतो.[4] सतराव्या शतकात सिद्धेन्द्र योगी यांनी कुचिपुडी गावातील युवकांना बरोबर घेऊन हा कलाप्रकार जगासमोर आणला.

Thumb

वैशिष्ट्य

हिंदू धर्म आणि त्यातील पौराणिक कथा यांची परंपरा जतन करून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य या नृत्यशैलीने केले आहे. विशेषतः वैष्णव संप्रदायाशी संबंधित अनेक कथा आणि आख्यायिका या शैलीने सादर केल्या जातात.[5] मंदिरे, राजदरबार यांच्या जोडीनेच सार्वजनिक उत्सवांमधेही हा नृत्यप्रकार सादर होताना दिसतो. हे नृत्य एकल पद्धतीनेही केले जाते.

शैली

"शब्दम्" या प्रकाराची प्रधानता यामधे असते, भरतनाट्यम प्रमाणेच यात तिल्लाना हा प्रकारही सादर होतो. पदलालित्य हे या शैलीचे महत्त्वाचे अंग मानले जाते.[1] नृत्याच्या शेवटी कलाकार थाळीमध्ये नर्तन करतो. हे नृत्य स्वतंत्र आणि लचकदार पद्धतीने केले जाते. लास्य आणि तांडव या दोन्हीचे मिश्रण यात असते. या पद्धतीला रंगमंच सादरीकरणासाठी आणण्याचे श्रेय सीतेद्र योगी यांना दिले जाते.[6][4] या नृत्यात प्रारंभी चार वेदातील निवडक मंत्र म्हणले जातात. त्यानंतर गणेश स्तुती म्हटली जाते. सूत्रधार हे पात्र रंगमंचावर येऊन या नृत्यनाट्याची रूपरेषा सांगते. प्रत्येक नर्तक हा तालाच्या साथीने नृत्य करीत रंगमंचावर प्रवेश करतो.[4] संस्कृत कवी जयदेव यांच्या गीतगोविंद या काव्याचा प्रभाव या नृत्यावर विशेष आहे. या काव्यायातील राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची काव्ये या नृत्यात सादर केली जातात.[2]

राजाश्रय

[2]विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय तिसरा हा साहित्य आणि काव्याचा जाणकार होता. त्याने या नृत्याला प्रोत्साहन दिले. इसवी सन १६७८ मध्ये गोवळकोंडा येथील नवाब अब्दुल हुसेन तनहिशा याचा कुचिपुडी गावात तळ होता. त्या दरम्यान त्याने तरुण नर्तक सिद्धेन्द्र योगी याचे नृत्य पाहिले आणि आनंदाने त्याला गौरव म्हणून ताम्रपट दिला ज्यामध्ये हे गाव भागवत नृत्य कलाकारांना इनाम दिले गेले.

Thumb

पोशाख

या नृत्यासाठी नर्तक वापरीत असलेला पोशाख हा भरतनाट्यम नृत्यशैलीच्या पोशाखासारखाच असतो.

प्रसिद्ध कलाकार

वेम्पतिचिन्ना सत्यम्, सी.रामाचारियोलु हे या शैलीचे प्रमुख अध्वर्यु मानले जातात. वेदान्तम सत्यनारायण, यामिनी कृष्णमूर्ती, शोभा नायडू, वैजयन्तीमाला, मल्लिका साराभाई, सुधा नायर हे या नृत्यशैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत. वेदान्त लक्ष्मी नारायण शास्त्री यांनी या नृत्याचा एकल सादरीकरण प्रकार प्रचारात आणला.[1]

हे ही पहा

नृत्य आंध्र प्रदेश

चित्रदालन

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.