कॅल्गारी
From Wikipedia, the free encyclopedia
कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर (टोरॉंटो व मॉंत्रियाल खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे.
जलद तथ्य
कॅल्गारी Calgary |
|
कॅनडामधील शहर | |
गुणक: 51°3′N 114°4′W |
|
देश | कॅनडा |
प्रांत | आल्बर्टा |
स्थापना वर्ष | इ.स. १८७५ |
क्षेत्रफळ | ८२५.३ चौ. किमी (३१८.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,४३८ फूट (१,०४८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १०,९६,८३३ |
- घनता | १,३२९ /चौ. किमी (३,४४० /चौ. मैल) |
- महानगर | १२,१४,८३९ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० |
www.calgary.ca |
बंद करा
१९८८ साली कॅल्गारीने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.