खोरासान प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
खोरासान (फारसी: استان خراسان) इराणचा एक प्रांत होता.
ऑगस्ट १९६९ आणि सप्टेंबर १९७८मध्ये या प्रांतात मोठे भूकंप झाले ज्यात अनुक्रमे १२,००० व २५,००० व्यक्ती मृत्यू पावल्या.
सप्टेंबर २००४मध्ये याचे तीन भाग होण्याआधी हा इराणचा सगळ्यात मोठा प्रांत होता.[1] हे तीन भाग असे आहेत --
- उत्तर खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: बोजनूर्द
- दक्षिण खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: बिरजांद
- रझवी खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: मशाद
याशिवाय खोरासान प्रांताचे काही भाग सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत तसेच यझ्द प्रांताला जोडले गेले.