डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचे ४५वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. २०२० च्या निवडणुकांमध्ये ज्यो बायडेनने ट्रम्प यांचा पराभव केला. १९९२मध्ये जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश यांच्यानंतर एकाच सत्रासाठी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

जलद तथ्य अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपती ...
डॉनल्ड ट्रम्प
Thumb

कार्यकाळ
२० जानेवारी २०१७  २० जानेवारी २०२१
उपराष्ट्रपती माइक पेन्स
मागील बराक ओबामा
पुढील ज्यो बायडेन

राजकीय पक्ष रिपब्लिकन
पत्नी मेलानिया ट्रम्प
व्यवसाय उद्योगपती
धर्म ख्रिश्चन
सही Thumb
बंद करा

निवडणूक

राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या २०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला. २०२० च्या निवडणुकीत ही जोडी ज्यो बायडेन व कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत झाली.

महाभियोग

पहिला महाभियोग खटला

२०१९मध्ये ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर युक्रेनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यासाठी दबाव आणला. अमेरिकेतील निवडणुकींमध्ये परदेशी शक्तींना लुडबुड करण्यास उद्युक्त करून आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्याबद्दलच्या काँग्रेसद्वारा चालविलेल्या चौकशीमध्ये अडथळे आणले असे दोन आरोप[1] ठेवून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने २४ सप्टेंबर, २०१९ रोजी ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला दाखल केला.[2] याला मंजूरी मिळाल्यावर अमेरिकेच्या सेनेटमध्ये हा दाखला चालविला गेला. रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सेनेटने ट्रम्प यांना ५१-४९ अशा जवळजवळ पक्षनिहाय मतदानाने निर्दोष ठरवले.[3] या खटल्यात एकही साक्ष घेण्यात आली नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांपैकी हा पहिला असा खटला होता.[4] ५२ रिपब्लिकन सेनेटरांपैकी फक्त मिट रॉमनी यांनी ट्रम्प दोषी असल्याचे मत दिले. आत्तापर्यंच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांमध्ये स्वतःच्याच पक्षाच्या सेनेटरने दोषी मत दिल्याचे हे पहिले उदाहरण होय[5]

दुसरा महाभियोग खटला

पुस्तके

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा
  • "ट्रंप ब्लॉग" (इंग्लिश भाषेत). 2017-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "द ट्रंप ऑर्गनायझेशन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.