तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.

जलद तथ्य तांदूळ, शास्त्रीय वर्गीकरण ...
तांदूळ
Thumb
शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: पोएसी (Poaceae)
शास्त्रीय नाव
oryza sativa ( औराइजा सैटाइवा )
बंद करा

तांदुळाच्या जाती

Thumb
काळी साळ

तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे.

"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.

न्यू यॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्‍न केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. त्यावरून असे ध्यानात आले की इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला असला पाहिजे. इसवी सनपूर्व २००० च्या आसपास जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.

आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता

छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. [1]

महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती

  • आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
  • कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या
  • चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली
  • टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
  • तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
  • पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
  • रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, सुरती
  • हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
तामिळनाडूमधील जाती
  • कादिरमंगलम्
कर्नाटकातील जाती
  • नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,

इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.

तांदुळावरील रोग

तांदुळाच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास ते या पिकावरील रस शोषून घेतात, त्यामुळे ते पीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..[2]

सेंद्रिय तांदूळ

'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. याचे उत्पादन बहुधा दशपर्णी अर्क, पालापाचोळा आणि सोनबुरूड खत वापरून केले जाते. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या आतेगाव या गावी अशा प्रकारचा सेंद्रिय तांदूळ पिकविण्यात येतो.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.