ताग
फुलांच्या वनस्पतीच्या प्रजाती / From Wikipedia, the free encyclopedia
ताग (इंग्रजीत ज्यूट) ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणाऱ्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.