डेहराडून
भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर. / From Wikipedia, the free encyclopedia
डेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे. गंगा नदी डेहराडूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून वाहते. डेहराडून भारताची राजधानी दिल्लीच्या २३६ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली डेहराडूनची लोकसंख्या सुमारे ५.७८ लाख होती. आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डेहराडूनमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. नैनिताल, मसूरी इत्यादी पर्यटनस्थळे तसेच हरिद्वार, ऋषिकेश इत्यादी धार्मिक स्थाने येथून जवळच असल्यामुळे डेहराडून एक गजबजलेले शहर आहे.
जलद तथ्य
डेहराडून | |
भारतामधील शहर | |
गुणक: 30°19′0″N 78°1′44″E |
|
देश | ![]() |
राज्य | उत्तराखंड |
जिल्हा | डेहराडून जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,४२७ फूट (४३५ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५,७८,४२० |
- महानगर | ७,१४,२२३ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
बंद करा