द्रविड मुन्नेत्र कळघम
भारतातील एक राजकीय पक्ष / From Wikipedia, the free encyclopedia
द्रविड मुन्नेत्र कळघम् किंवा कळहम् किंवा द्रविड मुन्नेत्र कळघम (तमिळ: திராவிட முன்னேற்றக் கழகம் ; स्थानिक उच्चार: तिमुका , तिमुक; रोमन लिपी: Dravida Munnetra Kazhagam / Dravida Munnetra Katchi ; अर्थ: द्रविड विकास संघटना) हा तमिळनाडू, भारतातील एक राजकीय पक्ष आहे. पेरियार यांच्या द्रविडार कळगम् (इ.स. १९४४ सालापर्यंत जस्टिस् पार्टी म्हणून परिचित) या पक्षापासून फुटून सी.एन. अण्णादुरै याने इ.स. १९४९ साली हा द्रविडी पक्ष स्थापन झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातल्या एखाद्या राज्यातल्या विधिमंडळाच्या निवडणुका स्वबळावर जिंकून आपली राजवट स्थापण्याची विक्रमी कामगिरी करणारा तो पहिला राजकीय पक्ष आहे[1].
अधिक माहिती द्रविड मुन्नेत्र कळघम ...
द्रविड मुन्नेत्र कळघम | |
---|---|
पक्षाध्यक्ष | एम.के. स्टॅलिन |
सचिव | दुराई मुरुगन |
लोकसभेमधील पक्षनेता | ए.के.एस. विजयन |
स्थापना | सप्टेंबर, इ.स. १९४९ |
मुख्यालय | अरिवालयम, अण्णा सालै, चेन्नई - ६०००१८ |
युती | संयुक्त पुरोगामी आघाडी (ऐक्किय मुर्पोक्कु कूट्टणी) (इ.स. २००४ पासून) |
प्रकाशने | 'मुरसोली' |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा