मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक / From Wikipedia, the free encyclopedia
मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.
दादर आणि परळ रेल्वे स्थानक मध्य व पश्चिम दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे.