मन्सूर अली खान पटौदी (उर्दू: منصور علی خان ; रोमन लिपी: Mansoor Ali Khan ;), लघुनाम एम.ए.के. पटौदी (रोमन लिपी: M.A.K. Pataudi), टोपणनाव टायगर (५ जानेवारी, इ.स. १९४१; भोपाळ, ब्रिटिश भारत - २२ सप्टेंबर, इ.स. २०११; नवी दिल्ली, भारत) हा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेटखेळाडू व माजी कर्णधार होता. भारतीय राज्यघटनेतील २६व्या घटनादुरुस्तीनुसार[1] इ.स. १९७१ साली भारतातील संस्थानिकांचे सर्व वतनाधिकार रद्द होईपर्यंत हा पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब होता.

जलद तथ्य
Thumb
Indian Flag
मन्सूर अली खान पटौदी
भारत
Thumb
फलंदाजीची पद्धतउजव्या हताने फलंदाजी
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यमगती
कसोटी प्रथम श्रेणी
सामने४६३१०
धावा २७९३१५४२५
फलंदाजीची सरासरी३४.९१३३.६७
शतके/अर्धशतके६/१६३३/७५
सर्वोच्च धावसंख्या२०३*२०३*
चेंडू१३२११९२
बळी१०
गोलंदाजीची सरासरी८८.००७७.५९
एका डावात ५ बळी--
एका सामन्यात १० बळी--
सर्वोत्तम गोलंदाजी१/१०१/०
झेल/यष्टीचीत२७/-२०८/-

क.सा. पदार्पण: १३ डिसेंबर, १९६१
शेवटचा क.सा.: २३ जानेवारी, १९७५
दुवा:

बंद करा

[[File:Mansoor Ali Khan Pataudi graph.png|left|thumb|350px|{{लेखनाव}] याच्या क्रिकेट कारकीर्दीतील कामगिरीचा आलेख.]] मन्सूर अली खानाने इ.स. १९६१ ते इ.स. १९७५ या काळात भारतीय क्रिकेट संघाकडून ४६ कसोटी सामने खेळले. तो प्रामुख्याने उजवखोरा फलंदाज म्हणून खेळत असे, तसेच उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करत असे. इ.स. १९६२ ते इ.स. १९७० या काळात त्याने ४० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले व त्यांपैकी ९ सामने भारताला जिंकता आले.

फुप्फुसांच्या संसर्गामुळे नव्या दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलात दाखल होऊन उपचार चालू असताना २२ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला[2]. भारतीय चित्रपट-अभिनेत्री शर्मिला टागोर त्याची पत्नी असून हिंदी चित्रपट-अभिनेता सैफ अली खान व हिंदी चित्रपट-अभिनेत्री सोहा अली खान त्याची मुले आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.