विकिपीडिया:परिचय
From Wikipedia, the free encyclopedia
विकिपीडिया मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! हा लेख विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून देईल. विकिपीडियामधील इतर मदतलेख मदत मुख्यालयात उपलब्ध आहेत तसेच आपल्याला काही शंका असतील तर त्या मदतकेंद्र येथे विचारा.
विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पानसुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करू शकता.
बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून द्या.