![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b8/Saif_Ali_Khan_snapped_at_Imperial_Hotel%252C_New_Delhi_05.jpg/640px-Saif_Ali_Khan_snapped_at_Imperial_Hotel%252C_New_Delhi_05.jpg&w=640&q=50)
सैफ अली खान
हिंदी चित्रपट अभिनेता / From Wikipedia, the free encyclopedia
सैफ अली खान ( १६ ऑगस्ट १९७०) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पटौदी व बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.
जलद तथ्य सैफ अली खान, जन्म ...
सैफ अली खान | |
---|---|
![]() | |
जन्म |
१६ ऑगस्ट, १९७० (1970-08-16) (वय: ५३) नवी दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | १९९२ - चालू |
वडील | मन्सूर अली खान पटौडी |
आई | शर्मिला टागोर |
पत्नी |
अमृता सिंग (१९९१-२००४) करीना कपूर (२०१२-चालू) |
नातेवाईक | सोहा अली खान (बहीण) |
बंद करा