स्टार अलायन्स
From Wikipedia, the free encyclopedia
स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमान कंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.
स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीम व वनवर्ल्ड ह्या इतर दोन संघटना आहेत.