![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f5/Flag_of_Cross_of_Burgundy.svg/langmr-640px-Flag_of_Cross_of_Burgundy.svg.png&w=640&q=50)
स्पॅनिश साम्राज्य
From Wikipedia, the free encyclopedia
स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, आफ्रिका, अमेरिका व ओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.
जलद तथ्य स्पॅनिश साम्राज्य ...
बंद करा
ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडीजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.