१९९० फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौदावी आवृत्ती इटली देशामध्ये ८ जून ते ८ जुलै १९९० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य Italia '90, स्पर्धा माहिती ...
Italia '90 | |
---|---|
स्पर्धेसाठी असलेला चेंडू | |
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | इटली |
तारखा | ८ जून – ८ जुलै |
संघ संख्या | २४ |
स्थळ | १२ (१२ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | पश्चिम जर्मनी (३ वेळा) |
उपविजेता | आर्जेन्टिना |
तिसरे स्थान | इटली |
चौथे स्थान | इंग्लंड |
इतर माहिती | |
एकूण सामने | ५२ |
एकूण गोल | ११५ (२.२१ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | २५,१६,३४८ (४८,३९१ प्रति सामना) |
← १९८६ १९९४ → | |
बंद करा
अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने आर्जेन्टिनाला १–० असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात निकृष्ट दर्जाची समजली जाते. बऱ्याचशा संघांनी बचावात्मक डावपेच वापरण्यावर भर दिला ज्यामुळे प्रति सामना गोलांची संख्या कमी झाली व सामने निरस झाले.