इकीया
From Wikipedia, the free encyclopedia
इकीया [1] (इंग्रजी उच्चार: आयकिया; मराठी लेखनभेद: इकीआ ; स्वीडिश: IKEA) ही आंतरराष्ट्रीय गृहोत्पादनांची व फर्निचर उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी खासगी रीटेल कंपनी आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी फर्निचर रीटेल कंपनी आहे [2].
इंग्वार कांप्राद या १७ वर्षीय स्वीडिश तरुणाने इ.स. १९४३ साली ही कंपनी स्थापली. त्याच्या नावाच्या "आय", "के" या आद्याक्षरांसह तो जेथे वाढला त्या "एल्मटारिड" या वाडीच्या नावातील "ई", व ती वाडी ज्या प्रांतात आहे त्या "आगुन्नारिड" प्रांताच्या नावातील "ए" या आद्याक्षरांतून बनवलेले "इकीया" हे नाव कंपनीस देण्यात आले [3].