पिन कोड
भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक / From Wikipedia, the free encyclopedia
पिन कोड किंवा पोस्टल इंडेक्स नंबर कोड म्हणजे भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.[1]
या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारताच्या ते विशिष्ट पोस्ट ऑफिस कोणते ते समजायला मदत होते.