बैसाखी
From Wikipedia, the free encyclopedia
वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे.[1] हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते.[2] हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे.[1] या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. १६९९ मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो.[3] हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.[4],[5]