सॅन फ्रान्सिस्को बे एरिया
From Wikipedia, the free encyclopedia
सान फ्रान्सिस्को बे एरिया तथा बे एरिया हा उत्तर कॅलिफोर्नियामधील सान फ्रान्सिस्को, सान पाब्लो आणि सुईसन खाड्यांच्या भोवतालचा प्रदेश आहे. यात अलामीडा, कॉन्ट्रा कोस्टा, मरिन, नापा, सान मटेओ, सांता क्लारा, सोलानो, सोनोमा, आणि सॅन फ्रान्सिस्को या काउंट्यांचा समावेश होते. क्वचित या प्रदेशात सांताक्रुझ आणि सान बेनितो काउंट्या व आसपासच्या प्रदेशाचाही समावेश केला जातो तसेच सान होआकिन, मर्सेड आणि स्टानिस्लॉस काउंट्यांमधील काही प्रदेशही यात गणला जातो. [1]
या प्रदेशात अंदाजे ७७.५ लाख लोक राहतात. १४ काउंट्यांमध्ये विस्तारलेले[1] बे एरिया महानगर क्षेत्र कॅलिफोर्नियामधील दुसऱ्या क्रमांकाचे (लॉस एंजेलस महानगरक्षेत्रामागे) तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे नागरी क्षेत्र आहे. जगात हे ४१व्या क्रमांकावर आहे.[2] बे एरियाची लोकवस्ती वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे: या प्रदेशातील अंदाजे निम्मे रहिवासी हिस्पॅनिक, आशियाई, आफ्रिकन अमेरिकन किंवा पॅसिफिक आयलँडर आहेत. यांत मूळचे भारतीय असलेल्या लोकांची वस्ती उल्लेखनीय आहे.