मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा '(६ एप्रिल १८८६ - २४ फेब्रुवारी १९६७) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८ च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले.[1] २६ जानेवारी १९५०रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. स्वातंत्र्या नंतरही १९४७ नंतर निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा छळ झाला. निजामाच्या काळात हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. निझामाने प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. मुस्लिम काळात भारतात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या निझामाच्या राज्यात वाढवली गेली. निझामाने नोकरी देण्याच्या नावाखाली हिंदू ज्ञानाची लुट केली गेली.[ संदर्भ हवा ]

Thumb
निजाम त्यांच्या पंतप्रधानांसह - "किशन प्रसाद" आणि इतर
Thumb
हैदराबादचे निजाम - मीर उस्मान अली खान

निजामाला "निझाम सरकार" किंवा "हजूर-ए-निजाम" म्हणत.[2] त्यानंतर भाषेच्या आधारावर हैदराबाद राज्याचे विभाजन होऊन त्याचे तुकडे आंध्र प्रदेशाचे, कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे भाग बनले.चा भाग बनला. त्यावेळवा निजाम हा सहावा निज़ाम -महबूब अली खानचा मुलगा होत. सतत पराभवातून स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्याचे तुरळक उदाहरण निजामचे संस्थान हे एक आहे. कधीही विजय झाला नाही हे याचे वैशिष्ट्ये. मराठ्यांबरोबरची पहिली लढाई : हार. दुसरी : हार. तिसरी : हार. असे जे सतराशे तेवीस-चौवीसपासून चालले ते सतराशे ब्याण्णवपर्यंत. सर्व मोठ्या लढ्यांत निजामाची हार झालेली दिसून येते.

रझाकार

मुख्य लेखविविधा: रझाकार (हैदराबाद) आणि रझाकार

रझाकार हे ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्यातील मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाचे कासिम रझवी यांच्या नेतृत्वात निमलष्करी स्वयंसेवक दल होते. बहुसंख्य-हिंदू समुदायाच्या उठावाच्या भीतीने, निजामाने कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखालील रझाकारांच्या निर्मितीला मंजूरी दिली ते हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी दल स्थापन केले होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.[3] हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या काळात केला गेला. या अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.[4]

Thumb
कासीम रझवी

रझाकरांच्या क्रौर्याची परिसीमा आजही जुन्या जाणत्या लोकांच्या मनातून गेलेली नाही.[5] आणि या सत्य घटनेवर आधारित रझाकार नावाचा मराठी चित्रपट सुद्धा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. रझाकारांनी हिंदूंचा धार्मिक छळ केला. तेलंगणातील वीरा बैरनपल्ली या गावात पुरुषांनी गोळ्या घालून ठार मारून हिंदू महिलांवर निर्दयीपणे बलात्कार केले. या दहशतीपासून वाचण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी शेतातील मोकळ्या विहिरीत उड्या घेतल्या. अनेक मंदिरेही रझाकारांनी लुटली.[6] रझाकारांनी १९४८ मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे त्यांच्या सैन्याचा पराभव होईपर्यंत त्यांची हिंदू विरोधी धार्मिक अत्याचारांची रानटी मोहीम सुरू ठेवली होती.

मंदिरांना दान

निजामाने हिंदू आणि मुसलमानांना सारखीच वागणूक दिली असे प्रपोगंडा पसरवले गेले. त्याने अनेक मंदिरांना वेळोवेळी सोने आणि पैसे दान केले अशा अफवा पसरवल्या आहेत. निजाम यादगीरगुत्ता मंदिर या फायलींमधील राज्य अभिलेखांच्या नोंदीवरून मीर उस्मान अली खान यांनी हे भद्राचलम मंदिराला ८२,८२५ रुपये आणि तिरुपती वेंकटेश्वर मंदिराला ते ५०,००० + ८ हजार रुपये दिले, असे दिसते.[7][8] पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला महाभारताची चिकित्सक आवृत्ती काढण्यासाठी सन १९३२ साली, सातवा निजाम, मीर उस्मान अली खान याने ११ वर्षांसाठी प्रतिवर्ष १,००० रुपयांच्या हप्त्यांनी एकूण ५०,००० रुपये दिले. [9][10]

शैक्षणिक सुधारणा

निजामाच्या हैदराबाद संस्थानातील शिक्षणाचे बजेट एकूण उत्पन्नाच्या सुमारे ११% होते. हे भारतातील कुठल्याही राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा कितीतरी जास्त आहे. निजामाने मराठवाडा क्षेत्रात कृषी संशोधनाचा पाया घातला. १८ मे १९७२ रोजी ही योजनेचे रूपांतर मराठवाडा कृषी विद्यापीठात झाले. निजामाने दिलेल्या ५४ एकर जमिनीवर मराठवाडा विद्यापीठ बनले..[11]

Thumb
AsafJah7 oath Rajpramukh 1950

शैक्षणिक संस्थांना देणग्या

निजामाने बनारस हिंदू विद्यापीठाला १० लाख रुपये व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला ५ लाख रुपये देणगीदाखल दिले.[12]

उस्मानिया विद्यापीठ

पहा उस्मानिया विद्यापीठ मीर उस्मान अली खानने उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ आज भारतीय उपखंडातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. निजामाने शाळा, महाविद्यालये स्थापन केली आणि भाषांतरासाठी अनुवाद विभाग स्थापन केला. प्राथमिक शिक्षणही अनिवार्य आणि गरिबांसाठी विनामूल्य केले. [13][14]

भारत-चीन युद्ध प्रयत्न योगदान

Thumb
निजाम पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री" सोबत

इंडो-चिनी मतभेदांमुळे होणाऱ्या संभाव्य युद्धासाठी , निजामाला राष्ट्रीय संरक्षण निधीला योगदान देण्याची विनंती झाली. मीर उस्मान अली खानने त्यासाठी ५,००० किलो सोने दिले. भारतातील कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला हे सर्वात मोठे योगदान आहे. [15]

पूर प्रतिबंधक उपाय

१९०८ सालच्या ग्रेट मुसी पुरात, अंदाजे ५०,००० लोक मरण पावले. निज़ामने आणखी मोठे पूर येऊ नयेत म्हणून उस्मान सागर आणि हिमायत सागर यांना रोखण्यासाठी दोन तलाव बांधले.

निजामाचे पूर्वीचे नाव उस्मान सागर, नंतर हिमायत सागर. त्याच्या मुलाचे नाव आझम जाह मीर हिमायत अली खान.[16][17][18].

मृत्यू आणि दफन

मीर उस्मान अली खानने २४ फेब्रुवारी १९६७रोजी किंग कोठी पॅलेस येथे शेवटचा श्वास घेतला. त्याचे दफन जुड़ी मस्जिदमध्ये झाले. ही मशीद १९३६ साली निजामाने आपल्या मुलाच्या-जवादाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृत्यर्थ बनवली होती. [19]

निजामाचा अंत्यसंस्कार (तत्कालीन) भारतीय इतिहासातील सर्वात मोठा होता, असे निजाम संग्रहालयाच्या कागदपत्रांत म्हणले आहे. अंदाजे १ कोटी लोक" निजामांच्या गन-कार्टच्या जुलूसमध्ये सामील खाले होते. हे निजामाच्या लोकप्रियतेचे पुरावे म्हणायला हरकत नाही. भारताच्या इतिहासात निजामाचे दफन हा सर्वात मोठा गैर-धार्मिक, बिगर राजकीय प्रसंग होता. शोकाकुल लोकांची संख्या इतकी जास्त होती की हैदराबादचे रस्ते आणि फुटपाथ तुटलेल्या बांगड्यांनी भरले होते. (तेलंगणाच्या परंपरेनुसार, स्त्रिया त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या बांगड्या फोडतात.)[20]

उस्मान अली खान यांचे नाव दिलेल्या संस्था आणि वास्तू

उस्मानिया युनिव्हर्सिटी, उस्मानिया जनरल हॉस्पिटल, उस्मानिया बिस्किटे, उस्मान सागर तलाव, उस्मानाबाद जिल्हा, वगैरे.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.