From Wikipedia, the free encyclopedia
२०२४ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १७ किंवा टाटा आयपीएल २०२४ ही इंडियन प्रीमियर लीग या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेची १७वी आवृत्ती असेल. [1] या स्पर्धेत दहा संघ २२ मार्च ते २६ मे, २०२४ दरम्यान सहभागी होतील [2]
२०२४ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
चित्र:File:Tata IPL Logo.webp | |||
तारीख | २२ मार्च, २०२४ – २६ मे, २०२४ | ||
व्यवस्थापक | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) | ||
क्रिकेट प्रकार | टी२० क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी | ||
यजमान | भारत | ||
सहभाग | १० | ||
सामने | ७४ | ||
अधिकृत संकेतस्थळ |
iplt20 | ||
दिनांक | २२ मार्च – २६ मे, २०२४ | ||
|
चेन्नई सुपर किंग्ज हे गतविजेते आहेत. त्यांनी मागील हंगामात गुजरात टायटन्सला हरवून पाचवे विजेतेपद पटकावले होते आणि मुंबई इंडियन्ससह स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-यशस्वी संघ झाले होते. [3]
या स्पर्धेतील दहा संघ प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटां (अ आणि ब) मध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील पाचही संघांविरुद्ध दोनदा (होम आणि अवे) आणि स्वतःच्या गटातील चारही संघांविरुद्ध एकदा खेळेल. प्रत्येक संघ सात घरचे आणि सात पाहुणे म्हणून सामने खेळतील. साखळी सामन्यांनंतरएकूण गुणांवरून यशस्वी चार संघ बाद फेरीत जातील. या टप्प्यात चार संघ एकमेकांशी स्पर्धा करतील..
टाटा समूहाने २५ अब्ज रुपये (५५.५ कोटी अमेरिकन डॉलर) देउन २०२४-२८ अशा पाच वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन प्रीमियर लीगचे प्रायोजकत्व घेतले. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक प्रायोजकत्व रक्कम आहे. टाटा समूहाने २०२२ आणि २०२३ मध्ये आयपीएलचे प्रायोजन केले होते. [5]
या हंगामात स्टार स्पोर्ट्स दूरचित्रवाणीवरून सामन्यांचे प्रसारण करेल तर जिओ सिनेमा डिजिटल प्रसारण करेल.
या हंगामात मागील हंगामाचे सगळे दहा संघ पुन्हा भाग घेतील.
India | ||||
---|---|---|---|---|
अहमदाबाद | बेंगलुरु | चेन्नई | दिल्ली | हैदराबाद |
गुजरात टायटन्स | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | चेन्नई सुपर किंग्स | दिल्ली कॅपिटल्स | सनरायझर्स हैदराबाद |
नरेन्द्र मोदी मैदान | एम. चिन्नास्वामी मैदान | एम.ए. चिदंबरम मैदान | अरुण जेटली मैदान | राजीव गांधी मैदानum |
क्षमता: १,३२,००० | क्षमता: ३५,००० | क्षमता: ३९,००० | क्षमता: ३५,२०० | क्षमता: ५५,००० |
जयपूर | कोलकाता | |||
राजस्थान रॉयल्स | कोलकाता नाइट रायडर्स | |||
सवाई मानसिंग मैदान | इडन गार्डन्स | |||
क्षमता: २५,००० | क्षमता: ६८,००० | |||
लखनौ | मोहाली | मुंबई | विशाखापटनम | |
लखनौ सुपर जायंट्स | किंग्स XI पंजाब | मुंबई इंडियन्स | दिल्ली कॅपिटल्स | |
इकाना क्रिकेट मैदान | आय.एस. बिंद्रा मैदान | वानखेडे मैदान | एसीए-व्हीडीसीए क्रिकेट मैदान [lower-alpha 1] | |
क्षमता: ५०,००० | क्षमता: २६,००० | क्षमता: ३३,००० | क्षमता: २७,५०० | |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.