आरमोरी तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

आरमोरी तालुकाmap
Remove ads

आरमोरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका व शहर असून गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ड वर वसले आहे.

जलद तथ्य

आरमोरी हे आरमोरी तालुक्याचे मुख्यालय आहे. चार तालुके मिळून बनलेल्या विधानसभा क्षे़त्राचे आरमोरी विधानसभा क्षेत्र आहे. प्रमुख व्यापार व्यवसायासाठीही आरमोरी हेच नाव आहे. आरमोरीला ५ जून २०१८ला नगर परिषदेचा दर्जा मिळाला.

या आरमोरी तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे १३०० चौ.मीटर असून तेथील लोकसंख्या ९७,००० आहे; त्यांतले ७० टक्के लोक साक्षर आहेत. या तालुक्यामधील एकूण१०३ खेड्यांमध्ये आदिवासी लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे.

आरमोरी तालुक्यात ठाणेगाव, वैरागड, आरमोरी येथील हेमाडपंती देवालये, वैरागड येथील नागवंशीय गोंड राजाचा किल्ला, वगैरे काही ऐतिहासिक वास्तू आहेत.. तालुक्यातल्या वैरागड येथे हिऱ्याच्या खाणी, व देऊळगाव येथे लोहखनिजाचा साठा आहे.

Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads