एप्रिल २३
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
एप्रिल २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११३ वा किंवा लीप वर्षात ११४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६३५ - अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८१८ - दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]
विसावे शतक
- १९२७ - तुर्कस्तान बालदिनाची सुट्टी साजरी करणारा पहिला देश ठरला.
- १९४२ - हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली.
- १९६७ - अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन सोवियेत संघाचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात प्रक्षेपित केले गेले.
- १९७१ - रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
- १९८४ - एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
- १९९० - नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९९३ - एरिट्रियाने इथियोपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.
एकविसावे शतक
Remove ads
जन्म
- ११८५ - अफोन्सो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.
- १५९८ - मार्टेन ट्रॉम्प, डच दर्यासारंग.
- १६२१ - विल्यम पेन, इंग्लिश दर्यासारंग.
- १६२८ - योहान व्हान वेवरेन हड्डे, डच गणितज्ञ.
- १६७६ - फ्रेडरिक पहिला, स्वीडनचा राजा.
- १७९१ - जेम्स बुकॅनन, अमेरिकेचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
- १८२३ - अब्दुल मजिद, ऑट्टोमन सम्राट.
- १८५८ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५८ - रमा बिपिन मेधावी, समाजसुधारक.
- १८७३ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्यता निवारणचे काम करणारे समाजसुधारक.
- १८९७ - लेस्टर बी. पियरसन, नोबेल पारितोषिकविजेता कॅनडाचा १४वा पंतप्रधान.
- १९३८ - एस. जानकी, शास्त्रीय गायिका.
- १९४१ - पाव्हो लिप्पोनेन, फिनलंडचा पंतप्रधान.
- १९८३ - डॅनियेला हंतुखोवा, टेनिस खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- इ.स. १६१६ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
- इ.स. १८५० - विल्यम वर्डस्वर्थ, इंग्लिश कवी.
- इ.स. १९२६ - हेन्री बी. गप्पी, ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ.
- इ.स. १९५८ - शंकर श्रीकृष्ण देव, समर्थ वाङ्मय आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक.
- इ.स. १९८६ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- इ.स. १९९२ - सत्यजित रे, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.
- इ.स. १९९७ - डेनिस कॉम्पटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- इ.स. २००० - बाबासाहेब भोपटकर, लालबागमधील भारतमाता चित्रपटगृहाचे चालक.
- इ.स. २००१ - जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, पत्रकार, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक
- २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- इ.स. २०१३ - शमशाद बेगम, हिंदी पार्श्वगायिका.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक पुस्तक दिन
- जागतिक प्रताधिकार दिवस
- संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - (एप्रिल महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads