डॉ. बी.आर. आंबेडकर पुतळा (हैदराबाद)

From Wikipedia, the free encyclopedia

डॉ. बी.आर. आंबेडकर पुतळा (हैदराबाद)
Remove ads

१२५ फुटांचा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा पुतळा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उभारण्यात आला आहे.[] या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे, जो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[][]

Thumb
१२५ फुट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हैदराबाद

२०१७ मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ व्या आंबेडकर जयंतीदिनी झाले.

११.४ एकर जागेवर हे स्मारक निर्माण केले गेले आहे, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत. संपूर्ण स्मारकासाठी खर्च सुमारे १४६.५ कोटी रुपये लागला.

Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads