तुळशी वृंदावन
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा उपलब्ध साहित्य (विटा, फरशी) वापरून बनवलेल्या तुळशीचे रोप लावायच्या कुंडीला तुळशी वृंदावन म्हणतात.[१] अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते. घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्रसंकेत मानला जातो. [२]काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते. नवीन वास्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते.

Remove ads
धार्मिक महत्त्व
तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. भारतीय स्त्रिया दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात. तुळशी वृंदावन ग्रामीण भागातील घरांच्या अंगणात असण्याचे हेही एक कारण आहे. तुळशी विवाहाच्या वेळी याच तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो. श्री क्षेत्र शिर्डी येथे मंदिर परिसरात असे एक तुळशी वृंदावन आहे. [३]भारतातील मंदिरांच्या परिसरात आणि कृष्ण मंदिरात तुळशी वृंदावन आढळून येते.[४] [५] तुळशीचं रोप प्रत्येक हिंदू घराची ओळख मानलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आली आहे की घरात तुळशी वृंदावन असायला हवं.[६]दररोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावावा तिन्हीसांजेला तुळशीपुढे दिवा लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते. तुळशी वृंदावन असेल तर वास्तुदोषांचे निराकरण होते अशी धार्मिक मान्यता आहे.
Remove ads
घडवणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस नावाच्या गावात घडविण्यात येणारी तुळशी वृंदावने सर्व महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहेत. येथील कुंभार समाज ही वृंदावने पारंपारिक रित्या बनवतो. सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते. येथली वृंदावने सर्व देवळांमध्ये स्थापित केली जातात.[७]
हे ही पहा
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads