राधा
प्रेमाची देवी, कृष्णाची मुख्य संगिनी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
राधा (संस्कृत: राधा, IAST: Rādha), तिला राधिका देखील म्हणतात, ही एक हिंदू देवी आहे आणि देव कृष्णाची सखी आहे. ती प्रेम, कोमलता, करुणा आणि भक्तीची देवी आहे. धर्मग्रंथांमध्ये, राधाचा उल्लेख लक्ष्मीचा अवतार आणि मूलप्रकृती, सर्वोच्च देवी म्हणून केला आहे, जी कृष्णाची स्त्री रूप आणि आंतरिक शक्ती (ह्लादिनी शक्ती) आहे. राधा कृष्णाच्या सर्व अवतारांमध्ये सोबत असते. दरवर्षी राधाष्टमीला राधाचा वाढदिवस साजरा केला जातो.
गौडीय वैष्णव सारख्या परंपरा तिला कृष्णाची प्रियकर म्हणून मानतात.
राधावल्लभ संप्रदाय आणि हरिदासी संप्रदायात केवळ राधालाच परम प्राणी म्हणून पूजले जाते. इतरत्र, निंबार्क संप्रदाय, पुष्टीमार्ग, महानम संप्रदाय, स्वामीनारायण संप्रदाय, वैष्णव-सहजिया, मणिपुरी वैष्णव आणि चैतन्य महाप्रभूंशी संबंधित गौडीय वैष्णव चळवळींमध्ये कृष्णाची सखी म्हणून तिला पूजले जाते.
राधाचे वर्णन ब्रज गोपींचे प्रमुख (ब्रजची गवळण) म्हणून केले जाते. तिने असंख्य साहित्यकृतींना प्रेरणा दिली आहे आणि कृष्णासोबतच्या तिच्या रासलीला नृत्याने अनेक प्रकारच्या कलाकृतींना प्रेरणा दिली आहे.[१]
राधा, राधिका, राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे.[२] त्याच जोडीने महालक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे. वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातील खान्देश (कानबाई म्हणुन) या प्रांतात विशेष पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीत निंबाक संप्रदाय [३] आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा संबंध जोडलेला दिसतो.[४] कालांतराने राधा ही लक्ष्मी किंवा अशा रूपात पूजनीय देवता म्हणून मान्यता पावली.[५]
कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि महाराज वृषभानु यांची कन्या[६][७]
Remove ads
व्युत्पत्ती
राधा या नावांमध्ये 'राध' असा संस्कृत धातू आहे , ज्याचा अर्थ "प्रसन्न करणे " असा होतो. समृद्धी किंवा यशस्विता असाही राधा या शब्दाचा अर्थ आहे. [८]
वैष्णव संप्रदायातील स्थान
भारतीय धर्मशास्त्राच्या परिभाषेत शृंगारभक्ती अशी संकल्पना प्रचलित आहे. राधा ही व्यक्तिरेखा या संकल्पनेशी संबंधित आहे. गौडीय वैष्णव आणि पुष्टीमार्गी वैष्णव या उपसंप्रदायांतील अद्वैत तत्त्वज्ञानाला अनुसरून राधा ही नायिका म्हणून प्रसिद्ध पावली आहे. मूलतः गोपी असलेली राधा या साहित्यात कामिनी आणि रमणी अशा रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे.[९]
साहित्यातील स्थान
हरिवंश पुराण किंवा महाभारत या ग्रंथात राधा ही व्यक्तिरेखा आढळत नाही. देवी भागवत या ग्रंथात तिचा उल्लेख आढळतो. तेथे श्रीकृष्णाची रासलीला आणि त्यातील त्याची प्रमुख सहचरी म्हणून राधेचा उल्लेख आढळतो.[५] वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा ही कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे. बाराव्या शतकात जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात.[१०] कवी जयदेवाच्या "गीत-गोविंद" या संस्कृत काव्यात राधेच्या प्रेमी नायिका रूपाचे वर्णन आढळते. श्रीकृष्ण आणि राधेच्या शृंगाराचे वर्णन या काव्यात प्रामुख्याने आलेले आहे.[४] बंगाली लोककथा या राधा कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करतात. त्याच जोडीने दास्य भक्तीचे उदाहरण म्हणूनही या लोकसाहित्यात राधेची व्यक्तिरेखा मान्यता पावली आहे.[११][१०]
ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्म पुराण यांनी मात्र राधा आणि कृष्णाच्या उत्कट प्रेमाचे वर्णनच अधिक केलेले दिसते.[१०]
शिल्पशास्त्रात
प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणाऱ्या-या अर्धनारीनटेश्वर शिल्प अंकनात राधा आणि कृष्ण यांचे अद्वैत प्रतिबिंबित होते आणि त्यातून त्यांचे प्रेम आणि भक्तीही अधोरेखित होते असे अभ्यासक मानतात.[१२]
रासलीला
राधा आणि कृष्ण यांच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार हा रासलीला या नृत्यप्रकारातून अभव्यक्त होते असे मानले जाते.गोपीच्या समवेत कृष्ण आणि राधा यांचे नृत्य असे या रासक्रीडेचे स्वरूप मानले जाते. मणिपुरी नृत्याच्या शास्त्रीय प्रकारात या रासनृत्याला विशेष महत्त्व आहे. भागवत पुराण, जयदेवाचे गीत-गोविंद यातील काव्य संकल्पना वापरून हे नृत्य केले जाते.[१३]
व्यक्तिरेखेचे स्वरूप
वैष्णव संप्रदायाच्या जोडीने राधा ही शाक्त संप्रदायाशी निगडित देवताही मानली जाते. प्रांताप्रांतानुसार तिच्या संकल्पनेच्या छटा आणि त्यांचा आशय बदलताना दिसतो. भक्तिसंप्रदाय हा भारतात लोकप्रिय होण्याच्या काळात मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून राधा ही देवता म्हणून अधिक मान्यता पावलेली दिसते.[१४]
तत्त्वज्ञानातील संकल्पना
भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्त्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्त्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. [१५]
श्रीकृष्ण हा ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व आहेत. अग्नी आणि त्याची धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.[१०]
Remove ads
राधा आणि अनय
जेव्हा श्रीकृष्णाने मथुरेसाठी प्रस्थान केले तेव्हा राधा देवीने स्वतःची छाया वृंदावनात ठेवून स्वतः गुप्त झाली याच छाया राधेचा विवाह अयनगोपासह वृंदावनात झाला.याचे प्रतिक म्हणून आज सुद्धा वृंदावनजवळील यावत या गावात तिचे सासर आहे तसेच अयन त्याची आई जटीला व बहीण कुटिला यांचे एक पुरातन मंदिर आहे वं समोरच राधाकृष्णाचे मंदिर आहे.जणू काही राधाकृष्ण आपले वास्तविक रूप या तिघांना दाखवत आहेत..!!
मंदिरे
राधा आणि कृष्ण हे वैष्णव संप्रदायाचे देवता युगुल असल्याने त्यांची मंदिरेही स्थापन झाली आहेत. मथुरेतील वृंदावन येथे तसेच बनारस येथे अशी मंदिरे आहेत.[१६] राधावल्लभ हे त्यातीलच एक मंदिर आहे. दिल्लीस्थित श्री राधा पार्थसारथी मंदिर हेही त्यांपैकीच एक मंदिर आहे. परदेशांतही या देवता युगुलाची मंदिरातून आदराने पूजा केली जाते.[१७]
चित्रदालन
- रासलीला चित्र
- स्वामींनारायण मंदिरातील राधा कृष्ण
- राधा-कृष्ण अर्धनारी
- पोखरा (नेपाळ)येथील राधाकृष्ण मंदिर
हे सुद्धा पहा
संदर्भ यादि
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads