पाटोदा तालुका
पाटोदा तालुक्यातील चिखली नाथ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरण From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
जवळाला येथे तपस्वी काशीगीरजी महाराज यांची समाधी स्थळ प्रशिद्ध आहे. जवळाला हे पाटोदा तालुक्यातील राजकिय द्रष्ट्या महत्त्वाच गाव. गावाची हद्द ही अहमदनगर बीड महामार्गालगत शंभरचिरा जावळे वस्ती पासून सुरू होते . रोड लगत असलेले उंच उंच निरगिलीची, वडाची झाडे सुंदर निसर्गरम्य वातावरणात शेजारीच असलेले शेततळे पाहण्यासारखे वातावरण आहे. मांजरा नदीची उपनदी जावळे नदीचा येथुनच उगम झालेला आहे.
गहिनीनाथगड चिंचोली नाथ ता.पाटोदा, जिल्हा बीड हे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामनभाऊ त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू करून ते सर्वत्र पोहोचविले. महाराष्ट्रातील एक समाजसुधारक व संत म्हनुन अाेळख असलेले संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान सावरगाव घाट ही याच तालुक्यात आहे. चिखली चिंचोली हे थंड हवेचे ठिकाने असून समुद्रसाटीपासून सुमारे ८९२ मीटर ऊंच अपर्णादेवीची टेकडी आहे. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिखली चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे. मांजरा (वांजरा)ही तालुक्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात. पाटोदा तालुक्यातील चिखली नाथ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads