पूर्णा नदी

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात बैतूल येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते.

जलद तथ्य पूर्णा नदी, इतर नावे ...

आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणाजळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.

पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.

Remove ads

चित्रदालन

Thumb
पूर्णा
Thumb
श्री क्षेत्र गंगामाई
Thumb
पूर्णा नदीच्या काठावरील एक प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण श्री क्षेत्र गंगामाई निरूळ गंगामाई (अमरावती जिल्हा)
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads