बौद्ध धर्म

तथागत बुद्धांनी स्थापन केलेला धर्म From Wikipedia, the free encyclopedia

बौद्ध धर्म
Remove ads

बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism) हा भारताच्या श्रमण परंपरेतून उदयास आलेला एक धम्म (जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञान) आहे. याला बौद्ध धम्म, बुद्ध धर्म किंवा बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६व्या शतकात धम्मचक्रप्रवर्तन करून बौद्ध धर्माची शिकवण दिली. बौद्ध परंपरेनुसार, गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते; त्यांच्यापूर्वीही बुद्ध झाले होते, आणि ही अनादि परंपरा त्यांनी पुढे नेली, याचा उल्लेख त्रिपिटक ग्रंथांत (विशेषतः बुद्धवंश) आढळतो.[] बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि पुढील दोन सहस्रकांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय आशियात तसेच जगभर पसरला.[] बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मवादी, समतावादी, विज्ञानवादी आणि मानवतावादी धर्म मानला जातो. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. हा धर्म स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मैत्री, प्रज्ञा आणि मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता आहे.[]

Thumb
गौतम बुद्ध यांचे शिल्प
Thumb
समाधी अवस्थेतील बुद्ध प्रतिमा, लाओस.
अधिक माहिती संस्थापक, स्थापना ...

इ.स. २०१० च्या अंदाजानुसार, जगभरात सुमारे ४८.९० कोटी ते ५३.५० कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी होते, जे जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे ७% ते ८% होते.[][] लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिश्चन धर्म (२.४ अब्ज), इस्लाम (१.९ अब्ज) आणि हिंदू धर्म (१.२ अब्ज) हे जगातील तीन सर्वात मोठे धर्म आहेत.[] सर्वाधिक बौद्ध अनुयायी चीन, जपान, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशांत आहेत.[] आशिया खंडात बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे, आणि आज तो १५० हून अधिक देशांत आढळतो.

Remove ads

उदय

कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००)

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००

 

भारत

प्रारंभिक
संघ

 

 

 

प्रारंभिक बौद्ध परंपरा महायान वज्रयान

 

 

 

 

 

श्रीलंका आणि
दक्षिण आशिया

 

 

 

 

थेरवाद

 

 

 

 

तिबेटी

 

प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म

 

Kadam
Kagyu

 

Dagpo
Sakya
  Jonang

 

पूर्व आशिया

 

प्राचीन बौद्ध संस्कृती
आणि महायान
रेशीम मार्गद्वारे
चीन, आणि रोमन साम्राजाशी संपर्क
भारत ते व्हियेतनाम

Tangmi

नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū)

शिंगोन बौद्ध धर्म

चान बौद्ध धर्म

 

Thiền, कोरियन सेआॅन
  जपानी झेन
Tiantai / जिंगतू

 

तेंदाई

 

 

निचिरेन

 

ज्युदो शू

 

मध्य आशिया

 

ग्रीक बौद्ध धर्म

 

 

रेशीम मार्ग बौद्ध धर्म

 

  इ.स.पू. ४५० इ.स.पू. २५० इ.स. १०० इ.स. ५०० इ.स. ७०० इ.स. ८०० इ.स. १२००
  Legend:   = थेरवाद   = महायान   = वज्रयान   = विविध धर्म आगमन
Thumb
धम्मचक्र

बौद्ध धम्म हा भारतातील श्रमण परंपरेतून उदयास आलेला एक प्राचीन धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ आणि परिवर्तनशील धर्म मानला जातो.[] गौतम बुद्ध यांनी इ.स.पू. ६व्या शतकात बौद्ध धम्माची शिकवण दिली. बौद्ध परंपरेनुसार, गौतम बुद्धांपूर्वी २१ बुद्ध होऊन गेले, यांचा उल्लेख त्रिपिटकात (विशेषतः बुद्धवंश) आढळतो.[] गौतम बुद्धांच्या काळानंतर इ.स.पू. ६व्या शतकापासून इ.स. ६व्या शतकापर्यंत बौद्ध धम्माचा विकास झाला. सम्राट अशोक यांच्या काळात (इ.स.पू. ३रे शतक) हा धर्म भारतभर पसरला आणि नंतर मध्य, पूर्व व आग्नेय आशियात प्रसारित झाला.[१०]

बौद्ध संस्कृतीचे योगदान मौर्य कला, गांधार कला आणि मथुरा कलेत दिसते. बौद्ध धम्माचा प्रसार त्रिपिटकाच्या साहित्यासह विहारां, स्तूपां, चैत्यां आणि लेण्यांद्वारे झाला. या विकासाला सुमारे १,१०० वर्षे लागली. बौद्ध धम्माने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक जीवनावर खोल प्रभाव टाकला.[११] १३व्या शतकात मुस्लिम आक्रमणांमुळे आणि हिंदू धर्माच्या पुनरुत्थानामुळे भारतात बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाला.[१२] काही इतिहासकारांच्या मते, बौद्ध मूर्तींचे हिंदूकरण आणि हिंदू राजांचे अत्याचार यांनीही याला हातभार लावला.[१३]

Remove ads

बुद्धांचे जीवन

मुख्य लेख: गौतम बुद्ध
Thumb
भगवान बुद्धांची प्रतिमा

तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणूनही ओळखले जातात. बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांचा पुत्र म्हणून इ.स.पू. ५६३ मध्ये त्यांचा जन्म लुंबिनी (आता नेपाल) येथे झाला.[१४] जन्मानंतर सातव्या दिवशी मायादेवीचे निधन झाले आणि सिद्धार्थाचा सांभाळ त्यांच्या मावशी प्रजापती गौतमी यांनी केला. यामुळे त्यांना "गौतम" हे नाव मिळाले. सिद्धार्थाला राजकुमार म्हणून सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ च्या सुमारास त्यांचा यशोधरा या राजकुमारीशी विवाह झाला आणि त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.[१५]

ज्ञानप्राप्ती

Thumb
बोधगया (बिहार) मधील महाबोधी विहार, येथे बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली

गृहत्यागानंतर सिद्धार्थाने ज्ञानासाठी कठोर तपश्चर्या केली. इ.स.पू. ५२८ च्या सुमारास बोधगया (आता बिहार) येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती (किंवा निर्वाण) झाली.[१६] त्यानंतर ते "बुद्ध" म्हणून ओळखले गेले. "बुद्ध" ही व्यक्ती नव्हे, तर ज्ञानाची अवस्था आहे.

धम्मचक्र प्रवर्तन

Thumb
सारनाथ येथील धामेक स्तूप, येथे बुद्धांनी पहिला उपदेश दिला

ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ (आता उत्तर प्रदेश) येथे पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला, ज्याला धम्मचक्रप्रवर्तन म्हणतात.[१७] या उपदेशात त्यांनी बौद्ध तत्त्वे मांडली आणि त्यांचे अनुयायी वाढले. सम्राट अशोक यांनी नंतर तिथे धामेक स्तूप बांधला.

महापरिनिर्वाण

Thumb
महापरिनिर्वाण प्रसंगाची प्रतिमा, कुशीनगर

इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर (आता उत्तर प्रदेश) येथे बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.[१८] त्यांचे अंत्यसंस्कार रामाभर स्तूपाजवळ झाले.

Thumb
रामाभर स्तूप, कुशीनगर
Remove ads

तत्त्वज्ञान व शिकवण

भगवान बुद्धांनी पाली या लोकभाषेतून साध्या शब्दांत बौद्ध धर्माची शिकवण दिली. त्यांनी त्रिशरण, चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) आणि पंचशील ही तत्त्वे मांडली.[१९]

चार आर्यसत्ये

Thumb
गौतम बुद्ध चार आर्यसत्यांची शिकवण देताना, नालंदा, बिहार, भारत

बुद्ध यांनी मांडलेली चार आर्यसत्ये ही बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया आहे:[२०]

दुःख - जीवनात दुःख आहे.

दुःखसमुदाय - दुःखाचे कारण तृष्णा (इच्छा, आसक्ती) आहे.

दुःखनिरोध - तृष्णेचा त्याग करून दुःखाचा अंत होतो.

दुःखनिरोधगामिनी प्रतिपद् - दुःखनिवारणासाठी अष्टांगिक मार्ग आहे.

पंचशील

मुख्य लेख: पंचशील

बुद्धांनी अनुयायांना खालील पाच शीलांचे पालन सांगितले:[२१]

अहिंसा - जीवहिंसा न करणे

अस्तेय - चोरी न करणे

काममिथ्याचार - व्यभिचार न करणे

मृषावाद - खोटे न बोलणे

सुरामेरय - मद्यपान व मादक पदार्थांपासून दूर राहणे

अष्टांगिक मार्ग

Thumb
धम्मचक्रातील आठ आरे अष्टांगिक मार्ग दर्शवतात

सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनात बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला, जो दुःखनिवारणाचा मध्यम मार्ग आहे:[२२]

सम्यक् दृष्टी - योग्य दृष्टिकोन

सम्यक् संकल्प - योग्य संकल्प

सम्यक् वाचा - योग्य वाणी

सम्यक् कर्मांत - योग्य कृती

सम्यक् आजीविका - योग्य उपजीविका

सम्यक् व्यायाम - योग्य प्रयत्न

सम्यक् स्मृती - योग्य स्मरण

सम्यक् समाधी - योग्य ध्यान

दहा पारमिता

बुद्धांनी दहा पारमितांचा (पूर्णतेचा मार्ग) उल्लेख केला, ज्या बोधिसत्त्व मार्गात महत्त्वाच्या आहेत:[२३]

दान - उदारता

शील - नीतिमत्ता

क्षांती - संयम (शांती)

वीर्य - परिश्रम

ध्यान - समाधी

प्रज्ञा - बुद्धिमत्ता

उपाय - कुशलता

प्रणिधान - संकल्प

बल - शक्ती

ज्ञान - ज्ञान

या तत्त्वांचे पालन केल्यास जीवन दुःखमुक्त आणि सुखमय होऊ शकते.

विज्ञाननिष्ठत्व

निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्त्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्याना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.

विज्ञाननिष्ठत्व

बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान विज्ञानाशी सुसंगत मानले जाते, कारण दोन्हींचा उद्देश सत्याचा शोध आहे.[२४] बौद्ध तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्यातील काही समानता खालीलप्रमाणे आहेत:

देव (ईश्वर) नाही

बौद्ध धम्मात देव किंवा ईश्वर या संकल्पनेला स्थान नाही. तथागत बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारले आणि सृष्टीचे नियंत्रण कारण-कार्याच्या नियमांवर अवलंबून असल्याचे सांगितले.[२५] विज्ञानही ईश्वराच्या अस्तित्वाला पुराव्याशिवाय मानत नाही.

आत्मा नाही

बुद्धांनी अनात्मवाद मांडला, म्हणजे आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही. शरीर पाच स्कंधांपासून (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) बनलेले आहे, जे मृत्यूनंतर विघटित होतात.[२६] विज्ञानानुसारही आत्मा हा प्रत्यक्ष पुराव्याशिवाय मानला जाणारा मानवी कल्पनेचा भाग आहे. अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही बौद्ध धम्मात जन्म नैसर्गिक प्रक्रियेवर अवलंबून आहे. बुद्धांनी स्वतःला शुद्धोधन आणि मायादेवी यांचा पुत्र म्हणून सांगितले, दैवी उत्पत्तीचा दावा केला नाही.[२७] विज्ञानही जन्माला नैसर्गिक प्रक्रिया मानते, जरी आधुनिक तंत्रज्ञान (उदा. टेस्ट ट्यूब बेबी) त्यात समाविष्ट आहे.

परिणाम सर्वत्र सारखेच

विज्ञानात संशोधनाचे परिणाम सर्वत्र समान असतात. त्याचप्रमाणे, बौद्ध धम्माचे तत्त्वांचे (उदा. पंचशील, अष्टांगिक मार्ग) पालन केल्यास त्याचे परिणाम सर्वत्र एकसमान असतात.[२८]

दैववाद (नशीब) अमान्य

बुद्धांनी कर्म सिद्धांतावर भर दिला, दैव किंवा नशीब नाकारले. कर्मानुसार, कृतीनुसार फळ मिळते.[२९] विज्ञानही कारण-कार्याच्या नियमावर आधारित आहे, दैववादाला मानत नाही.

जगाची उत्क्रांती

डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत १९व्या शतकात मांडला, परंतु बुद्धांनी इ.स.पू. ६व्या शतकात विश्वाची उत्पत्ती स्वयंभू नाही, तर बदलांची प्रक्रिया आहे असे सांगितले.[३०]

विज्ञानाची नम्रता

बुद्ध म्हणाले, "माझ्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, स्वतः तपासून पाहा."[३१] विज्ञानही संशोधनाला अंतिम मानत नाही, सतत तपासणीवर भर देते.

अनित्य

बुद्धांनी सर्व अनित्य आहे असे सांगितले, म्हणजे सर्वकाही बदलते.[३२] विज्ञानानुसारही विश्वातील ग्रह, तारे आणि सजीव सतत बदलतात.

अकारण काहीही नाही

बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद (कार्यकारण सिद्धांत) मांडला, ज्यात प्रत्येक गोष्टीला कारण असते.[३३] विज्ञानही कारणाशिवाय काहीही होत नाही असे मानते.

Remove ads

समाज जीवनावर प्रभाव

बौद्ध धर्माचा जगातील अनेक समाजांवर प्रभाव पडलेला आहे. त्याच्या तत्त्वांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांत बदल घडवले.[३४]

बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव

बौद्ध धर्मातील अहिंसा, करुणा आणि प्राणिमात्रांविषयी सहानुभूती या तत्त्वांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. वैदिक परंपरेत प्राणिबलिदान प्रचलित असताना, बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे अहिंसा तत्त्वाला महत्त्व प्राप्त झाले.[३५]

वैचारिक स्वातंत्र्य

बौद्ध धर्मात वैचारिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन आहे. बुद्धांनी शिकवण तपासून स्वीकारण्यास सांगितले, ज्याचा परंपरागत वैदिक पद्धतीवर प्रभाव पडला.[३६]

सद्गुणांचा विकास

बौद्ध धर्माने पंचशीलाच्या माध्यमातून अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रियसंयम आणि मादक पदार्थांचा त्याग या सद्गुणांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे नैतिक जीवनाला चालना मिळाली.[३७]

समता तत्त्वाचा प्रभाव

तथागत बुद्धांनी जात, वर्ण किंवा सामाजिक दर्जा न पाहता समतेचा उपदेश केला. याने हिंदू समाजातील जातिव्यवस्थेला आव्हान दिले.[३८]

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास

बौद्ध धर्माच्या तर्कनिष्ठ आणि कारण-कार्यावर आधारित शिकवणीमुळे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला.[३९]

नैतिक सिद्धांताचा प्रभाव

बौद्ध धर्मात करुणा, प्रामाणिकपणा, अहिंसा आणि क्षमाशीलता यांना महत्त्व आहे. याने हिंदू धर्मातील नियतिवादाला आव्हान दिले आणि नैतिकतेवर भर वाढला.[४०]

बौद्ध धर्माचे कलेतील योगदान

बौद्ध धर्माने वास्तुविद्या, लेण्या, विहारे आणि स्तूपांच्या निर्मितीत योगदान दिले. मौर्य कला, गांधार कला आणि मथुरा कला यांतून हा प्रभाव दिसतो.[४१]

स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान

पाली आणि प्राकृत भाषांतून त्रिपिटकासारख्या ग्रंथांचे लेखन झाल्याने स्थानिक साहित्याचा विकास झाला.[४२]

शिक्षणास प्रोत्साहन

बौद्ध धर्माने विहारे आणि मठांना शिक्षण केंद्रे बनवले. तक्षशिला आणि नालंदा ही बौद्ध प्रभावातील विद्यापीठे प्रख्यात झाली.[४३]

भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार

बौद्ध धर्माने श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार आदी देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.[४४]

आर्थिक विकासाला प्रोत्साहन

अशोकाच्या काळात बौद्ध धर्माने आर्थिक समृद्धीला चालना दिली. त्याच्या साम्राज्याने व्यापार आणि शेतीला प्रोत्साहन दिले.[४५]

Remove ads

बौद्ध साहित्य

मुख्य लेख: बौद्ध साहित्य

पाली भाषेतील ग्रंथ

पालीतील बौद्ध ग्रंथ प्राचीन आणि मध्यवर्ती आहेत. यातील प्रमुख ग्रंथ खालीलप्रमाणे:[४६]

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ, ज्याचे तीन भाग आहेत:

    • विनयपिटक - भिक्षूंसाठी नियमांचा संग्रह
      • पाराजिक
      • पाचित्तिय
      • महावग्ग
      • चुल्लवग्ग
      • परिवार
    • सुत्तपिटक - बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह
      • दीघनिकाय
      • मज्झिमनिकाय
      • संयुत्तनिकाय
      • अंगुत्तरनिकाय
      • खुद्दकनिकाय (१५ उपविभाग):
      • खुद्दकपाठ
      • धम्मपद
      • उदान
      • इतिवुत्तक
      • सुत्तनिपात
      • विमानवत्थु
      • पेतवत्थु
      • थेरगाथा
      • थेरीगाथा
      • जातक
      • निद्देस
      • पटिसम्भिदामग्ग
      • अपदान
      • बुद्धवंस
      • चरियापिटक

संस्कृत भाषेतील ग्रंथ

तिबेटी भाषेतील ग्रंथ

  • कंजूर - बुद्धांचे उपदेश
  • तंजूर - टीका आणि व्याख्या[४८]

चिनी भाषेतील ग्रंथ

  • महाभिनिष्क्रमणसूत्र - बुद्धांचा गृहत्याग
  • महापरिनिर्वाणसूत्र - महापरिनिर्वाणाचे *वर्णन
  • जातक-निदान - जातक कथा
  • महावंस - इतिहास[४९]

ब्रह्मी लिपीतील ग्रंथ

सिंहली भाषेतील ग्रंथ

  • दीपवंस - बौद्ध इतिहास
  • महावंस - महानाम याने रचलेला इतिहासग्रंथ
  • ज्ञानोदय - बौद्ध शिकवण[५०]

मराठी भाषेतील ग्रंथ

काही प्रमुख मराठी ग्रंथ:

(इतर अनेक ग्रंथ आहेत, येथे निवडक दिले आहेत.)

बंगाली भाषेतील ग्रंथ

  • बुद्धदेव - सतीशचंद्र विद्याभूषण
  • बौद्धधर्म - सत्येंद्रनाथ टागोर

इंग्लिश भाषेतील ग्रंथ

संस्कृत भाषेतील ग्रंथ

  1. ललित विस्तर
  2. बुद्धचरितअश्वघोष
  3. लंकावतार-सूत्र

तिबेटी भाषेतील ग्रंथ

  1. क्यांग-र
  2. ग-छेररोल्प

चिनी भाषेतील ग्रंथ

  1. महाभिनिष्क्रमणसूत्र
  2. महापरिनिर्वाणसुत्त
  3. जातक-निदान
  4. महावंस

ब्रह्मी लिपीतील ग्रंथ

म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांची ब्रह्मी लिपीत भाषांतरे झाली आहेत.

सिंहली भाषेतील ग्रंथ

  1. दीपवंस
  2. महावंस — (लेखक- महानाम)
  3. ज्ञानोदय

मराठी भाषेतील ग्रंथ

  1. आपला बौद्ध धर्म (चंद्रकांत बीडकर)
  2. कथा गौतम बुद्धाची (रमेश पतंगे)
  3. ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण (डॉ. वि.रा. करंदीकर)
  4. भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म (गंगाधर महाम्बरे)
  5. गौतम बुद्धाचा धम्मच जगाला वाचवू शकेल (डी.डी. बंदिष्टे)
  6. गौतमबुद्ध ते महात्मा गांधी (न.चिं. केळकर)
  7. गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन (रा.ना. चव्हाण)
  8. गौतम बुद्ध जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान (डॉ. शशिकांत साळवे)
  9. गौतम बुद्धांचे चरित्र (कृष्णराव अर्जुन केळूसकर)
  10. गौतम बुद्धांच्या गोष्टी (डॉ. प्रभाकर चौधरी)
  11. गौतम बुद्धांच्या गोष्टी (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)
  12. जातककथा (गौतम बुद्धाच्या पूर्व जन्मातील कथा. अशा या ५४६ कथा आहेत. बुद्धाने प्रत्येक जन्मात एकेक गुण मिळवून शेवटी बुद्धपद गाठले. दुर्गा भागवत यांनी पालीमधील या कथांचे मराठी भाषांतर करून त्या ७ खंडांत आणि ३,२०० पानांत लिहिल्या)
  13. जातककथा (धर्मानंद दामोदर कोसंबी)
  14. जातकमाला (मूळ पाली जातककथांचा संस्कृत अनुवाद)
  15. जातककथा : खरी मैत्री आणि इतर कथा... (बालसाहित्य, लेखक - संजय कोल्हटकर)
  16. जातककथा - लबाड कोल्हा आणि इतर कथा...(बालसाहित्य, लेखक - संजय कोल्हटकर)
  17. थेरवाद बौद्धदर्शन (डॉ. ज.र. जोशी)
  18. धम्मपदं (नवसंहिता) (आचार्य विनोबा भावे)
  19. धर्म व धर्मपंथ (प्र.न. जोशी)
  20. बालजातक : बालांसाठी जातककथा (एकूण ५३ निवडक कथा, लेखिका - दुर्गा भागवत)
  21. बुद्ध आणि त्यांचा धम्म (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
  22. बुद्ध आणि कार्ल मार्क्स (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
  23. बुद्ध, धर्म आणि संघ (धर्मानंद कोसंबी)
  24. बुद्ध - बुद्धी का उच्चतम विकास (हिंदी, लेखक - सरश्री)
  25. बुद्धा : द प्रॅक्टिकल मार्ग (विशाल नंदा )
  26. बुद्धाचा भौतिकवाद (डी.वाय. हाडेकर)
  27. बुद्धाचे आर्थिक विचार (मीना शेट्टे-संभू , प्रभावन विरियाखन)
  28. बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (चिं.वि. जोशी)
  29. बोधि-सत्त्व (नाटक, धर्मानंद दामोदर कोसंबी)
  30. बोधिसत्वाच्या बोधपर ९० गोष्टी (रमेश मुधोळकर)
  31. बौद्धदर्शनसार (बापटशास्त्री)
  32. बौद्ध धम्माची पहिली संगीती (डी.टी. सावंत)
  33. बौद्ध धम्माचे आचरण कसे करावे? (विलास वाघ)
  34. बौद्ध धम्मात शिक्षेची संकल्पना (विलास वाघ)
  35. बौद्धधर्म मार्गदीप (हरिभाऊ पगारे)
  36. बौद्ध धर्माचा इतिहास (डॉ. अशोक भोरजार, प्रभाकर गद्रे)
  37. बौद्ध धर्माचे भारतीय संस्कृतीला योगदान (आर. डी. जाधव)
  38. बौद्ध धर्मातील स्त्रीविचार (डॉ. लता दिलीप छत्रे)
  39. बौद्ध नीतिकथा (डॉ. ज.र. जोशी)
  40. बौद्ध विचारधारा (संपादक : महेश देवकर, लता देवकर व प्रदीप गोखले)
  41. बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास (वा.गो. आपटे)
  42. भगवान बुद्ध (धर्मानंद दामोदर कोसंबी)
  43. महात्मा गौतम बुद्ध (चरित्र, लेखक - साने गुरुजी)
  44. विदर्भातील बुद्ध धम्माचा इतिहास (डॉ. प्रदीप मेश्राम)
  45. विसुद्दीमग्ग (धर्मानंद दामोदर कोसंबी)
  46. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध (डॉ. आ.ह. साळुंखे)
  47. श्रीहर्ष (पारखीशास्त्री)

बंगाली भाषेतील ग्रंथ

  1. बुद्धदेव — प्रो. सतीशचंद्र विद्याभूषण
  2. बौद्धधर्म — सत्येंद्रनाग टागोर

इंग्लिश भाषेतील ग्रंथ

  1. द लाईट ऑफ एसिया — एडविन अर्नोल्ड, १८७९
  2. द गोस्पेल ऑफ बुद्ध — पॉल कॅरस, १८९४
  3. बुद्धिझम इन् ट्रान्सलेशन्स — हेन्री क्लर्क वॉरेन, १८९६
  4. सम सेइंग्ज ऑफ द बुद्ध — एफ.एल. वुडवर्ड, १९२५
  5. अ बुद्धिस्ट बायबल — ड्वाइट गोडार्ड, १९३२
  6. अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स — ई.जे. थॉमस, १९३५
  7. द वेदांतिक बुद्धिझम ऑफ द बुद्ध — जे.जी. जेनिंग, १९४७
  8. द टीचिंग्ज ऑफ द कम्पॅशनेट बुद्ध — इ. ए. बर्ट, १९५५
  9. द बुद्ध अँड हिज धम्मबाबासाहेब आंबेडकर, १९५७
  10. गौतम द बुद्ध : हिज लाईफ अँड हिज टीचिंग्ज (विपक्षणा रिसर्च इन्सिट्यूट)
  11. बुद्धिझम अँड मॉडर्न थॉट्स — ई.जी. टेलर
  12. बुद्धिझम — ई.जे. मिल्स
  13. बुद्धिझम एथिक्स — डबल्यू.टी. स्टेस
  14. बुद्धिझम ऑफ विझडम अँड फेथ — थिच थेईन् ताम, १९९१
  15. व्हॉट द बुद्धा टॉट् — वालपोल राहुल, १९५९
  16. लिव्हिंग धम्म — व्हेनेरेबल अजान्ह चाह
  17. व्हॉट बुद्धिस्ट बिलीव्ह — व्हेन.के. श्री धम्मानंद, १९९३
  18. आउटलाईन्स ऑफ महायान बुद्धिझम — डी.टी. सुझुकी, २००५
  19. इसेन्स ऑफ बुद्धिझम - पी. लक्ष्मी नरसु, १९०७
Remove ads

बौद्ध प्रतीके

बौद्ध धर्मात बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याबरोबरच इतर महत्त्वाची प्रतीके आहेत.[५२]

Thumb
धम्मचक्र

धम्मचक्र - अष्टांगिक मार्गाचे प्रतीक, बौद्ध तत्त्वज्ञानाचा आधार.

Thumb
पंचशील बौद्ध ध्वज

बौद्ध ध्वज - पंचशीलाच्या पाच रंगांचे प्रतीक, एकता आणि शांती दर्शवते.

Thumb
अशोक चक्र, भारताच्या राष्ट्रध्वजावर अंकित

अशोक चक्र - अशोकाच्या धम्मचक्राचे प्रतीक, भारताच्या राष्ट्रध्वजावर अंकित.

संप्रदाय

Thumb
तीन प्रमुख बौद्ध संप्रदायाचा विस्तार


  • बौद्ध धर्मात अनेक संप्रदाय आहेत, त्यातील प्रमुख खालीलप्रमाणे:[५३]


याशिवाय शेकडो लहान संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत.

Remove ads

लोकसंख्या

मुख्य लेख: जगातील बौद्ध धर्म

जगभरात सुमारे ४८ कोटी ८० लाख (४८८ दशलक्ष) बौद्ध आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ७% आहेत (२०१० च्या आकडेवारीनुसार).[५४] यापैकी सुमारे ५०% महायान संप्रदायाचे, ३५-४०% थेरवाद संप्रदायाचे आणि उर्वरित वज्रयाननवयान संप्रदायाचे आहेत. या प्रमुख संप्रदायांव्यतिरिक्त बौद्ध धर्मात अनेक उपसंप्रदाय आहेत, परंतु त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. बौद्ध धर्माचा सर्वाधिक प्रभाव पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामध्ये दिसतो, जिथे अनेक देशांमध्ये बौद्ध बहुसंख्याक आहेत. दक्षिण आशियातील काही देशांतही बौद्धांचे प्रमाण लक्षणीय आहे. आशिया खंडाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप खंडांतही लाखो बौद्ध समुदाय राहतात. जगात ७ देशांत बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे: कंबोडिया, थायलंड, म्यानमार, भूतान, श्रीलंका, लाओस, आणि मंगोलिया. काही देशांत बौद्ध लोकसंख्येबाबत विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.

अधिक माहिती देश, बौद्ध लोकसंख्या ...

चित्रदालन

बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते

बौद्ध धर्म आणि गौतम बुद्ध यांच्याबद्दल अनेक विचारवंतांनी मते व्यक्त केली आहेत. खाली काही निवडक मते दिली आहेत:

माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याचेशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे.[५५] डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्मात मुक्तीसाठी ज्ञान अनिवार्य आहे, तर ख्रिश्चन आदर्शात ज्ञानाला स्थान नाही.[५६] डब्ल्यू. टी. स्टेस
बौद्ध धर्म ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देतो.[५७] ई. जे. मिल्स
बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.[५८] स्वामी विवेकानंद
ऐतिहासिक धर्मांपैकी मी बौद्ध धर्माला पसंत करतो.[५९] बर्ट्रांड रसेल
Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads