रामगुंडम
तेलंगणााच्या पेद्दापल्ली जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख औद्योगिक शहर From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
रामगुंडम हे तेलंगणााच्या पेद्दापल्ली जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. रामगुंडम शहर तेलंगणाच्या उत्तर भागात गोदावरी नदीच्या काठावर करीमनगरच्या ६० किमी ईशान्येस तर हैदराबादच्या २५० किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली रामगुंडमची लोकसंख्या सुमारे २.२९ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
रामगुंडम येथे दक्षिण भारतामधील सर्वात मोठे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. २६०० मेगावॉट क्षमतेचे येथील एन.टी.पी.सी. केंद्र आय.एस.ओ. १४००१ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले वीजनिर्मिती केंद्र होते. येथे तयार होणारी वीज तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व केरळ ह्या ६ राज्यांना पुरवली जाते.
रामगुंडम रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथे अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads